
डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक
सहसा लोकांना अनोळखी नंबरवरून कॉल येतात. पण कधी असं झालं आहे का, की तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तुम्ही कॉल उचलला. पण कॉल उचलल्यानंतर समोरून आवाजच आला नाही…? तुमच्यासोबत देखील अशी एखादी घटना घडली असेल तर सावध राहा. गेल्या काही काळापासून अनेक लोकांना सायलेंट कॉल्स येत आहेत. याबाबत अनेकांनी तक्रार केली आहे. अनेकांना वाटलं की, हे खराब नेटवर्कमुळे घडत आहे. पण असं नाही. याबाबत डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने अलर्ट जारी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
साइलेंट कॉल्स ही सायबर गुन्हेगारांनी शोधलेली नवीन पद्धत आहे, ज्याद्वारे लोकांची फसवणूक केली जाऊ शकते. या पद्धतीमध्ये डेटा चोरी आणि सायबर फ्रॉडच्या मदतीने लोकांची फसवणूक केली जाते. अनेक लोकांनी तक्रार केल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने लोकांना अलर्ट करण्यासाठी एक्सवर पोस्ट शेअर केल्या आहेत. डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये साइलेंट कॉल्स स्कॅमबाबत काय सांगितलं आहे, जाणून घेऊया.
डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, फोन वाजला, उचलला… पण आवाजचं येत नाही? हा कोणताही सामान्य कॉल नाही. स्कॅमर्स या पद्धतींचे कॉल करून यूजर्सचा नंबर अॅक्टिव्ह आहे की नाही, याबाबत जाणून घेत आहेत. जर तुमच्या फोनवर देखील असा एखादा कॉल आला आणि दुसऱ्या बाजूला कोणताही आवाज आला नाही, तर कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर परत कॉल करण्याची चूक करू नका. कारण अशा पद्धतीच्या कॉल्सच्या मदतीने फ्रॉडर्स तुमचं अकाऊंट हॅक करू शकतात, त्यामुळे सावध राहा. अशा कोणत्याही नंबरवरून कॉल आला तर कॉलबॅक करण्याऐवजी लगेच संचार साथी अॅपवर रिपोर्ट करा आणि सावध राहा.
sancharsaathi.gov.in वर जा. आता होम पेजवर Citizen Centric Services सेक्शनमध्ये जा. या सेक्शनमध्ये तुम्हाला Chakshu ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर टॅप करा. यानंतर पुढील स्टेपवर तुम्हाला तीन ऑप्शन्स मिळतील. पहिला मलिशस वेब लिंक्स रिपोर्ट, फ्रॉड रिपोर्ट किंवा स्पॅम की रिपोर्ट. तुम्हाला यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. कोणताही पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देण्यास सांगितले जाईल. एकदा तुम्ही माहिती भरली की, तुम्ही तुमची तक्रार सबमिट करू शकता.
Ans: इंटरनेट, मोबाइल, ई-मेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी आर्थिक किंवा वैयक्तिक माहितीची फसवणूक म्हणजे सायबर फ्रॉड.
Ans: फोन वाजतो पण समोरून आवाज येत नाही. कॉल जास्त वेळ ठेवला तर रेकॉर्डिंग, चार्ज किंवा फसवणुकीचा धोका असतो.
Ans: ताबडतोब 1930 हेल्पलाईनवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.