
काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत.... 'त्या' एका चुकीने कंपनीला बुडवले
1990 च्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीला भारत मोबाईल क्रांतीची सुरुवात करत होता. छोटा बाजार, कमकुवत नेटवर्क आणि महागडे फोन, अशी काहीशी परिस्थिती बाजारात निर्माण झाली होती. याच गोष्टींचा फायदा घेऊन नोकियाने रणनिती तयार केली आणि त्यांचे मोबाईल बाजारात लाँच करण्यास सुरुवात केली.
साधा फोन + मजबूत हार्डवेअर + दीर्घ बॅटरी आयुष्य + विश्वसनीय सेवा, अशा सर्व गोष्टींनी नोकियाने भारतीयांची मन जिंकली. नोकियाने लग्जरी ट्रेंड म्हणून नाही तर लोकांच्या गरजेनुसार फोन बनवण्यास सुरुवात केली. यासाठीच कंपनीने स्वस्त, टिकाऊ आणि सोप्या यूजर-इंटरफेसवाले मॉडेल लाँच केले. ग्रामीण भागात नेटवर्क सपोर्ट, धूळ आणि उष्णता सहनशील हार्डवेअर आणि दिर्घकाळ बॅटरी असलेले फोन यामुळे नोकिया इतरांपेक्षा वेगळा दिसला.
भारतातील नोकियाच्या इतिहासात Nokia 3310 चे स्थान अतिशय महत्त्वाचे होते. हा केवळ डिव्हाईस नाही तर एक आयकॉन होता. Nokia 3310 एक मजबूत, सोप्या इंटरफेसवाला आणि मजबूत नेटवर्क प्रदान करणारा फोन होता. याच कारणामुळे Nokia 3310 ने भारतात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हा फोन पडल्यानंतर देखील व्यवस्थित सुरु होता, एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांची बॅटरी ऑफर करत होता, तर गेमपासून सोप्या मेन्यूपर्यंत हा फोन प्रत्येकाच्या आवडीचा विषय ठरला होता. 3310 व्यतिरिक्त 1100, 6600, 2100 सारखे नोकिया मॉडेल्स देखील भारतात प्रचंड लोकप्रिय होते. 2005–2010 दरम्यान नोकीयाचा शेअर्स 60 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. हा एक असा आकडा होता, जिथे पोहोचणं कोणत्याही कंपनीला शक्य नव्हतं. एवढं सगळं चांगलं सुरु असताना असं काय झालं की नोकिया अचानक गायब झाली?
जेव्हा एका साध्या मोबाईलचं रुपांतर स्मार्टफोनमध्ये झालं तेव्हा नोकियाला खरी टक्कर मिळाली. टचस्क्रीन, अॅप्स, इंटरनेट आणि ऑपरेटिंग सिस्टम… यामुळेच भविष्यात प्रगती होणार आहे. पण हे समजण्यासाठी नोकियाला फार उशीर झाला. 2008–2009 मध्ये गूगलने अँड्रॉयड OS लाँच केले, जो ओपन-सोर्स होता आणि प्रत्येक ब्रँडसाठी उपलब्ध होता. हे वेगवान, मॉडर्न, अॅप-फ्रेंडली आणि सतत अपडेट केले जात होते. मात्र नोकियाने ही सिस्टम वापरण्यास नकार दिला. कंपनी त्यांच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम Symbian वर अडून राहिली, ज्यामुळे कंपनीचा दबदबा कमी झाला आणि कंपनी इतरांपेक्षा मागे पडली. याच दरम्यान सॅमसंगने अँड्रॉईड स्मार्टफोन्स लाँच करण्यास सुरुवात केली. ज्यांची खासियत कमी किंमत, मोठी स्क्रीन आणि नवीन फीचर्स असे होते. या स्मार्टफोन्सकडे लोकं आकर्षित होऊ लागली. बदल न करणं आणि त्याच जुन्या सिस्टिमचा वापर करणं, ही नोकियाची सर्वात मोठी चुक ठरली.
नोकियाचे Ovi Store अॅप मार्केटमध्ये वर्चस्व निर्माण करू शकली नाही. नोकिया हार्डवेयरमध्ये मजबूत होते, पण लोकं सॉफ्टवेयरच्या जगात शिफ्ट होऊ लागले होते. अँड्रॉइडचा स्विकार न करणं, सिम्बियन ओएसवर अडून राहणं, स्मार्टफोन ट्रेंडमध्ये मागे राहणं, अॅप इकोसिस्टममध्ये मागे राहणं, इंटरनल मॅनेजमेंटमधील चूक आणि सॅमसंग, माइक्रोमॅक्स, शाओमी यांसारख्या ब्रँड्सची मजबूती, यामुळे नोकिया त्यांचं अस्तिव गमावू लागले आहे. स्मार्टफोन युगात Android स्वीकारण्यात झालेला उशीर आणि Windows Phone वर जास्त अवलंबून राहणे यामुळे कंपनीचा दबदबा संपला.
Android ऐवजी Windows Phone OS निवडणे ही Nokia ची सर्वात मोठी आणि महागात पडलेली चूक मानली जाते. अखेर, 2014 मध्ये, नोकियाचा मोबाईल व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकण्यात आला. हा निर्णय म्हणजे मोबाईल साम्राज्यातील नोकियाचे अस्तिव संपण्यासारखे होते. नोकिया आता एक नवीन कंपनी एचएमडी ग्लोबल (HMD Global) सह स्मार्टफोन बनवते. यातील काही मॉडेल्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.
Ans: Nokia चे फोन मजबूत (टिकाऊ), विश्वासार्ह बॅटरी आणि साधा वापर यासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे जगभरात Nokia वर लोकांचा प्रचंड विश्वास होता.
Ans: स्मार्टफोन युगात Android स्वीकारण्यात झालेला उशीर आणि Windows Phone वर जास्त अवलंबून राहणे ही मोठी कारणे ठरली.
Ans: Android ऐवजी Windows Phone OS निवडणे ही Nokia ची सर्वात मोठी आणि महागात पडलेली चूक मानली जाते.