विराट कोहली वेगवेगळ्या साम्राज्यांचा राजा असता तर कसा दिसला असता? AI फोटो आले समोर
विराट कोहलीला क्रिकेटचा राजा म्हटले जाते, पण यावेळी त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये, त्याला एआयच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यांचा खरा राजा म्हणून दाखवण्यात आले आहे
या फोटोजमध्ये विराट कोहली भारत, आफ्रिका, ब्रिटन, चीन, जपान आणि इतर अनेक देशांचा राजा दाखवण्यात आला आहे
मुख्य म्हणजे, यातील प्रत्येक फोटोमध्ये त्याचा पोशाख, हेअर स्टाईल सर्वच फार अनोखे आणि साजेसे असे आहे. फोटोतील त्याचे हे लूक आता चाहत्यांना चांगलेच घायाळ करत आहेत
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयची कमाल दिवसेंदिवस नवनवीन रुपात समोर येत आहे. हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही हव्या त्या काल्पनिक गोष्टी घडवून आणू शकता
हे सर्व AI फोटोज @sahixd नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहेत