परदेशामध्ये जाऊन शतक झळकावणारे कर्णधार. फोटो सौजन्य - X (BCCI)
इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट कोहली हा SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके करणारा भारतीय आहे. त्याने या देशांमध्ये कर्णधार म्हणून ७ कसोटी शतके झळकावली आहेत.
या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्णधार म्हणून त्यांनी सेना देशांमध्ये ५ कसोटी शतके झळकावली आहेत.
शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यापासूनच आपल्या कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली आहे. दुसरी कसोटी अजूनही एजबॅस्टन येथे सुरू आहे पण गिलने SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने लीड्स कसोटीत १४७ धावांची खेळी खेळली. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या दिवशी तो ११४ धावांवर नाबाद आहे.
भारताचे दिग्गज खेळाडु आणि क्रिकेटचा देव म्हणुन ओळखले जाणारे महान सचिन तेंडुलकरने कर्णधार असताना सेना देशांविरुद्ध २ शतके झळकावली आहेत. त्यांनी त्याच्या नावावर अनेक विक्रम केले आहेत.
सौरव गांगुली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्यांची घोषणा केली जाते. सौरव गांगुलीने कर्णधार असताना सेना देशांमध्ये २ कसोटी शतकेही केली आहेत.
भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेने त्याच्या कर्णधारपदाखाली सेना देशांमध्ये कसोटी शतकांचे खाते उघडले आहे. त्याच्या नावावर असे एक शतक आहे.