सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी. फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर सध्या २६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३८ षटकार आहेत. रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने हा विक्रम केला.
वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत ३०१ एकदिवसीय सामने खेळले आणि ३३१ षटकार मारले आहेत.
एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू आफ्रिदीने ३९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५१ षटकार मारले.
श्रीलंकेचा माजी आक्रमक सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्या चौथ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याने ४४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७० षटकार मारले.
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी या यादीत पाचव्या स्थानावर आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज धोनीने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये २२९ षटकार मारले.
गस अॅटकिन्सनने टाकलेल्या दुसऱ्या षटकात षटकार मारताच रोहित ख्रिस गेलच्या पुढे गेला. त्याने सामन्यात ९० चेंडूत ११९ धावा केल्या, ज्यात १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.