मंदिरात जाण्यापूर्वी पहिल्या पायरीच्या पाया का पडतात? कारण घ्याच जाणून...
हिंदू धर्मात, मंदिर हे देवाचे निवासस्थान मानले जाते. काही मान्यतांनुसार, मंदिराला देवाचं रुपंही मानलं जातं. यानुसार, मंदिराचं शिखर देवाचं मुख मानलं जातं तर पायऱ्यांना देवाच्या चरणांच प्रतिक मानलं जातं
परिणामी मंदिराच्या कळसाकडे पाहताना नेहमीच आपले डोळे भरुन येतात तर मंदिराच्या पायरीवर नतमस्तक होताना अनेकांचे डोळे मिटतात
मंदिराबाबत शास्त्रीय कारणं देखील सांगितले जाते की, मंदिरात प्रचंड प्रमाणात सकारात्मक उर्जेचा वावर असतो
ही उर्जा मंदिराच्या गर्भगृहापासून ते पायरीपर्यंत प्रवाहित होत असते, ज्यामुळे मंदिरात प्रवेश करताच व्यक्ती या उर्जेच्या संपर्कात येतो
या सकारात्मक उर्जेच्या उद्देशाने पायरीला स्पर्श केला जातो. असं केल्याने, नकारात्मक विचारांची साखळी तुटते अशी मान्यता आहे