नव्या नवरीने पिवळ्या रंगाची साडीच का नेसावी? स्टायलिश लुक देत मराठमोळा साज करा परिधान
मराठी लग्नांमध्ये वधू लग्न लागताना पिवळ्या रंगाची साडी नेसते. ही पिवळी साडी किंवा अष्टपुत्री नवरीला तिचा मामा देतो. त्यामुळे मराठमोळ्या लग्नात कायमच पिवळ्या रंगाची नऊवारी साडी घालून या पद्धतीने सुंदर लुक करू शकता.
अनेकांना लग्नात रॉयल लुक हवा असतो. अशावेळी तुम्ही पिवळ्या रंगाच्या डिझायनर साडीची निवड करू शकता. या साडीवर कुंदन किंवा सोन्याचे दागिने उठावदार दिसतील.
लग्नात काहींना खूप जास्त हेवी साडी आणि मेकअप नको असतो, अशावेळी उत्तम पर्याय म्हणजे कांजीवरम सिल्क साडी. पिवळ्या रंगाच्या कांजीवरम सिल्क साडीवर हिरव्या रंगाचे दागिने शोभून दिसतील.
लग्नाच्या दिवशी खूप जास्त घाईगडबड असते. त्यामुळे नऊवारी साडी नेसण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी सहावारी साडीमधील असा सुंदर आणि मनमोहक लूक करू शकता.
इतरांपेक्षा वेगळा आणि युनिक लुक हवा असेल तर या पद्धतीने साऊथ इंडियन लुक करून त्यावर हिरव्या बांगड्या परिधान करू शकता.