
Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील'; ठाकरे गटाच्या 'या' बड्या नेत्याचं विधान
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका आता घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे. असे असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्याचीच सध्या चर्चा सुरु आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार सोडून जातील, अशा बातम्यांमुळे शिंदे नाराज आहेत. हे तर आता सुरु झालेले आहे. ज्या पद्धतीने त्यांचे आपापसांत मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरु झाले आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कामे थांबवले आहेत. अनेक जण आमदार वगैरे फडणवीस यांना कुठलाही थारा देत नाहीत, अशी माहिती मला मुंबईमध्ये एका खूप मोठ्या माणसाने सांगितली. कुणीही गेले तरी देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करत नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना खूप काही देत असत. त्यावेळी त्यांनी भाजपला काहीही दिले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आता तर सुरुवात झाली
ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांना भरभरून द्यायचे. त्यावेळेस त्यांनी भाजपला दिले नाही. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस देऊ लागले. मला एकच सांगायचे आहे, आता प्रत्यक्षात सगळीकडून बातम्या यायला लागले आहेत. ते इकडून चालले, ते तिकडून चालले. आता तर सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात आपापसात भांडणे सुरू केली आहेत, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व काम थांबवले आहे.
…तरी फडणवीस काम करत नाहीत
कोणीही गेले तरी देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करत नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आमदारांना खूप काही देत असत. त्यावेळी त्यांनी भाजपला काहीही दिले नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार