चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का (फोटो- ट्वीटर)
चंद्रपूरमध्ये कॉँग्रेसला मोठा धक्का
माजी आमदाराने सोडली पक्षाची साथ
निवडणुकीच्या आधी दिसून आले पक्षांतर
Chandrpur Congress: गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षातील नेतेमंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसून आले. काही दिवस आधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांतर झाल्याचे पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. एका माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कॉँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी कॉँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आणि चिमुर भागात कॉँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. अविनाश वारजूकर हे कॉँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपा परिवाराच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन चिमूर (जि.चंद्रपूर) येथील कॉंग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजुकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपाचे कमळ हाती घेतले. पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी जि.प. अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव सतिश वारजुकर, युवक काँग्रेसचे… pic.twitter.com/MiJbQfPGpI — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) February 26, 2026
माजी आमदार अविनाश वारजूकर यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपची स्थिती मजबूत झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अविनाश वारजूकर यांनी प्रवेश केला आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे अविनाश वारजूकर आणि असंख्य पदाधिकारी यांनी कॉँग्रेसची साथ सोडली असल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका करत देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “भारतात आता शांतीपूर्ण मार्गाने विरोध करणे हा सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे,” अशा गंभीर शब्दांत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून सरकारला घेरले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अशा वळणावर नेले जात आहे, जिथे असहमतीला ‘देशद्रोह’ आणि प्रश्न विचारण्याला ‘कट’ मानले जात असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, कोणताही मुद्दा असो, जर कोणी संविधानाच्या चौकटीत राहून सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला, तर त्याला लाठीमार, खोटे खटले आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी विविध उदाहरणे देऊन सरकारची कोंडी केली.
आज भारत में Compromised PM के राज में शांतिपूर्ण विरोध करना ही सबसे बड़ा “अपराध” बना दिया गया है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र को धीरे-धीरे ऐसी दिशा में धकेला जा रहा है, जहां असहमति को देशद्रोह और सवाल पूछने को साज़िश बताया जाता है। सोचिए – मुद्दा कोई भी हो, अगर आप सत्ता के… — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2026
ते म्हणाले की, “पेपर लीक प्रकरणाने त्रस्त झालेल्या तरुणांनी जेव्हा आपल्या भविष्यासाठी आवाज उठवला, तेव्हा त्यांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. देशाचा गौरव असलेल्या महिला कुस्तीपटूंनी भाजपच्या बड्या नेत्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी मागितली, तेव्हा त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले. तसेच, बलात्कार पीडितेच्या समर्थनात इंडिया गेटवर झालेल्या शांततापूर्ण निदर्शनांना प्रशासनाने ‘असुविधा’ मानून दडपले.” अमेरिकेसोबतच्या व्यापारी कराराचा (US Trade Deal) विरोध करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘देशविरोधी’ ठरवून अटक केल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.






