Abdul Sattar gave clarification on upset and leaving the Shinde group shivsena mahayuti
मुंबई: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळाले असले तरी देखील महायुतीमध्ये नाराजीचा पूर आलेला आहे. अनेक नेते हे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. तर महाविकास आघाडीमधील नेते हे दारुण पराभव झाल्यामुळे नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील माजी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे नाराज आहेत. यामध्ये आता अब्दुल सत्तार यांनी राजकीय निवृत्तीचे भाष्य केले असून यावरुन जोरदार राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली. यावर आता आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अब्दुल सत्तार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमामध्ये निवृत्ती व पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अब्दुल सत्तार हे लवकरच शिंदे गट सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. आता अब्दुल सत्तार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगिगले आहे.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला महाराष्ट्र दौरा आहे. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. ऐतिहासिक असा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या सर्व नेत्यांना भेटणार आहेत. या भेटीसाठी भाजप, अजित पवार गटाचे आमदार व शिंदे गटाचे सर्व आमदार मुंबईमध्ये दाखल झाले आहे. महायुतीच्या या बैठकीसाठी सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा कोणत्या तरी राज्याच्या आमदारांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत,” असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिवर
पुढे अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्याच पक्षामध्ये राहणार असल्याचे सांगितले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, “मी पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार नाही हे मी आता देखील बोलतो आहे. सिल्लोड विधानसभा मी आता लढणार नाही. मी कोणावरही नाराज नाही. माझ 64 वर्षे वय आहे. मी पाच वेळा आमदार राहिलो आहे. वयानुसार काही निर्णय घ्यावे लागतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील ते बघू तो मला मान्य राहिल. पण मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्येच आहे आणि खूश आहे,” असे मत अब्दुल सत्तार यांनी मुंबईमध्ये व्यक्त केले आहे.