'मातोश्री'वर लिंबू अन् काळी जादू; फडणवीस 'वर्षा'वर का राहत नाहीत? राऊतांचा राणेंना सवाल
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकारण तापले आहे. आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून वाल्मिक कराड याची आई आणि समर्थकांनी मोठा गदारोळ करत आंदोलन केले आहे. आरोपीच्या समर्थनार्थक केले जाणारे आंदोलन हे घातक असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. यावरुन खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी येत असतील तर त्यांचं मुंबई स्वागतच करेल. ते तर आमचे देशाचे पंतप्रधान आहेत. आता धारावीचा प्रश्न आहे. आम्ही त्यांच्याकडे धारावी आमची लुटू नका म्हणून मागणी केली आहे. बघू आता धारावीबाबत काही घोषणा करतायेत का बघूया. आता पंतप्रधान हे मणिपूरमध्ये कधी जाणार हे देखील पाहावं लागेल. दिल्ली निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांना प्रचाराचं कोणतं काम नसेल त्यामुळे त्यांनी मणिपूरला जावं, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
ईव्हीएम आणि नोटांची पूजा करा
पुढे ते म्हणाले की, महायुतीच्या कार्यक्रमाच्या मंचावर आज ईव्हीएम मशीन ठेवून त्याची पूजा केली पाहिजे. नोटांची बंडल देखील ठेवली पाहिजे. मग मंचावर विजयाचे शिल्पकार येतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि प्रफुल पटेल यांच्यावर पंतप्रधानांनी मंचावर स्वतः गंभीर आरोप केले होते. पण आता ते त्यांना बाजूला ठेवणार आहेत का? ही सगळी ढोंग आहेत. महायुतीमध्ये 40 टक्के लोक हे कलंकित आहे. तर मग धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीचे 40 टक्के नेते कलंकित
महयुतीमधील हे नेते हे कलंकित आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे सातत्याने सांगत होते. आता ते कसे काय स्वच्छ झाले? त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि इतरांना एक न्याय हा काय प्रकार आहे? हा फार संशोधनचा प्रकार आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच वाल्मिक कराडच्या समर्नार्थ आंदोलन करत परळी बंदची हाक देणाऱ्या आंदोलकांवरुन देखील संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
ते म्हणाले की, हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला मोक्का लावणं आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यांवर उतरणं हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार होत असेल. हा हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या कायदेशीर कारवाई सुरु होत असताना एखाद्या गुन्हेगाराला भाजपचे समर्थक म्हणून घेणार लोक रस्त्यावर उतरतात. हिंसाचार करतात. परळी बंद ठेवतात आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. हा काय प्रकार आहे? याचं उत्तर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.