Cockroach Janata Party PC: 'ज्ञानेश कुमारे सर्वात मोठे देशद्रोही?' अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
निवडणूक आयोगातील तीनही निवडणूक आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभार समोर आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.
कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, जर ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर पक्ष देशव्यापी आंदोलन सुरू केलं जाईल, असा इशाराही दिपके यांनी दिला आहे.
“ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत. ते सर्वात मोठे राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी एसआयआरच्या माध्यमातून देशातील १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली आहेत.ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त झाल्यापासून, विविध राज्यांमधील १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. भाजपची सत्ता कधीच जाऊ नये म्हणून ज्ञानेश कुमार मुद्दाम मते वगळत आहेत का? हे करण्याची काय गरज होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “आम्ही देशातील जनरेशन-झेड आणि तरुणांना आवाहन करतो की, देश वाचवण्यासाठी तुम्ही पुढे आलेच पाहिजे. स्वातंत्र्यापासून या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. जेव्हा ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गरीब होती, तेव्हाही बाबासाहेब आणि पंडित नेहरू म्हणाले होते की प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क असावा.”
आपल्या देशात लोकशाहीचा अर्थ काय होता? लोकशाही म्हणजे लोकांनी सरकार निवडणे. ज्ञानेश मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून, कोणाला मतदानाचा हक्क द्यायचा आणि कोणाला नाही, हे सरकारच ठरवत आहे. ही लोकशाहीची कसली व्याख्या आहे? तुम्ही लोकशाहीची मूळ संकल्पनाच उलटीपालटी करून टाकली आहे.”






