CJP Kerala Protest 7th November: दिल्ली आंदोलनांनंतर सीजेपीची नवी खेळी! केरळमध्ये SIR विरोधात ७ नोव्हेंबरला आंदोलनाची हाक
ट्विटर ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, सीजेपीने आंदोलनाची घोषणा केली आहे. जंतर मंतर येथील आंदोलनाच्या धर्तीवर, कोचीमधील राजेंद्र मैदानावर सायंकाळी ४:०० वाजता आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू…; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का
सीजेपीचे दक्षिण प्रादेशिक प्रमुख विजय मल्लांगी आणि राष्ट्रीय सचिव आफरीन नवाज हे देखील कोचीमधील आंदोलनात उपस्थित राहणार आहेत. दक्षिण भारतातील सीजेपीचा हा पहिला मोठा उपक्रम आहे. “लोकशाही वाचवा! एसआयआर (SIR) रद्द करा! आमच्यात सामील व्हा -७ नोव्हेंबर-दुपारी ४:०० वाजता, राजेंद्र मैदान, कोची.” असा संदेश देथ एक्स (X) वरील आपल्या पोस्टमध्ये सीजेपीने केरळवासियांना आवाहन केले आहे.
यापूर्वी दिल्लीत, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेविरोधात जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना सीजेपी नेत्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात, अभिजीत दीपके, आशुतोष रांका व सौरभ दास यांच्यासह इतर सीजेपी नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यांनी आवश्यक परवानगी न घेता जंतर मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर, सरकारने जंतर मंतरचा ‘आंदोलन स्थळ’ म्हणून असलेला दर्जा रद्द केला.
U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
गेल्या महिन्यात सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी विनापरवानगी जंतरमंतरवर प्रवेश करत तिरंगा फडकावल्या प्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एक आठवडा तुरुंगात घालवल्यानंतर त्यांना लेखी आश्वासनांसह सोडण्यात आले. जोपर्यंत जंतर मंतरला अधिकृतपणे आंदोलनाचे निश्चित ठिकाण म्हणून घोषित केले जात नाही, तोपर्यंत तेथे पुढील कोणतेही आंदोलन करणार नाही, या अटीसह त्यांची सुटका करण्यात आली.
दुसरीकडे, गेल्या महिन्यात कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये ‘लेहरा दो तिरंगा’ची घोषणा करणाऱ्या अभिजीत दीपके यांनाही आंदोलना पूर्वीच दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एसईएमने नंतर त्यांना सशर्त जामिनावर सोडले. ते पुढील एक वर्ष शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाहीत, या अटीखाली त्यांना जामीन देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
या सर्व घडामोडींनंतर सीजेपीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा दिला. परंतु रामलीला मैदानावर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील रॅलीत भाग घेतला नाही. आता, सीजेपी केरळमधील काँग्रेसशासित राज्य असलेल्या कोचीमध्ये एक नवीन आंदोलन सुरू करण्याची तयारी करत आहे.
Ans: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सघन मतदार यादी सुधारणा (SIR) प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी आणि ती तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सीजेपीने या आंदोलनाची घोषणा केली आहे.
Ans: हे आंदोलन ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता केरळमधील कोची येथील राजेंद्र मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
Ans: आंदोलनात सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह पक्षाचे दक्षिण प्रादेशिक प्रमुख विजय मल्लांगी आणि राष्ट्रीय सचिव आफरीन नवाज उपस्थित राहणार आहेत.






