Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke CJP: आमची मते हवी असतील तर….; हिंगोलीच्या शाळेतून अभिजीत दिपकेंचा राज्य सरकारला थेट इशारा

Abhijeet Dipke CJP: जर अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळेत शिकतात. पण सरकारी शाळा संभाळण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांचीच आहे. त्यांचीही मुले या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली पाहिजेत. जेवढेही शिक्षणाधिकारी आहेत, त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत टाकले पाहिजे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 18, 2026 | 03:00 PM
Hingoli News, ZP School, Maharashtra Education, Abhijeet Dipke CJP, School Thik Karo Abhiyan,

Hingoli News, ZP School, Maharashtra Education, Abhijeet Dipke CJP, School Thik Karo Abhiyan,

Follow Us
Follow Us:
  • १५ ऑगस्ट २०२६ पासून हिंगोलीतून कॉकरोच जनता पार्टीतर्फे मोहिमेचा प्रारंभ.
  • लिंबाळा MIDC शाळेत दारूच्या नशेत आढळलेल्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन.
  • ५ वेळा निवेदने देऊनही कारवाई न केल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.
 

Abhijeet Dipke  School Thik Karo Abhiyan:  “आमची मते हवी असतील तर, आधी आमच्या ग्रामीण भागातील सरकारी शाळा दुरुस्त करा, सुधाराव्या लागतील, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जेवढी मेहनत घेत आहात, तेवढी राज्यातील सरकारी शाळांसाठीदेखील करा, शाळेत दर्जेदार शिक्षण द्या, शिक्षक उपलब्ध करून द्या,” अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी इशारा दिला आहे.

15 ऑगस्ट 2026 रोजी सीजेपीचे स्कुल ठिक करो या मोहिमेला सुरवात झाली. या मोहिमेची सुरुवात अभिजीत दिपके यांनी त्यांची हिंगोली येथील गावच्या शाळेला भेटापासून झाली. या शाळेभेटीवेळी त्यांनी अनेक गोष्टींकडे सरकारसर संपूर्ण राज्याचेही लक्ष वेधले. त्यानंतर आजपासून त्यांनी पुन्हा एकदा हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. हिंगोलीतील लिंबाळा येथील MIDC शाळेला भेट दिली त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दारुच्या नशेत झोपले बोते. त्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला. अभिजीत दिपके यांनी तातडीने या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून माहिती देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

BJP New National Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममधून 2029च्या निवडणुकीची रणनीती

नशा करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात गावातील नागरिकांनी पाच वेळी निवेदन देऊनही दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाई का केली नाही, असा सवालही अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जर शिक्षण अधिकाऱ्यांची मुले या शाळेत शिकत असती आणि एखादा दारुच्या बाटल्या घेऊन बसलेल्या मुख्याध्यापक असता तर त्यांनी तो सहन केला असता का, मग गावकऱ्यांनी तो का सहन करावा, गावकऱ्यांनी पाच वेळा दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यासाठी मागणी केली असतानाही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, आता आंदोलनाला बसल्यावरच जाग कशी आली, असे खडे सलावलही अभिजीत दिपकेंनी उपस्थित केले.

जर अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळेत शिकतात. पण सरकारी शाळा संभाळण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांचीच आहे. त्यांचीही मुले या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली पाहिजेत. जेवढेही शिक्षणाधिकारी आहेत, त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत टाकले पाहिजे. मग कळेल या गावकऱ्यांच्या मुलांना काय सहन करावे लागते, अशी टिकाही अभिजीत यांनी यावेळी केली.

Eknath Shinde Marathi Speech: मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान

शाळांची परिस्थिती भयावह

देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली असतानाही शाळेतील मुलांना आजही स्वच्छ पाणी आणि बसायला बेचेंस नाही, शौचालये नाही, ब्लॅक बोर्ड नावाचा प्रकार नाही, भिंतींना काळा रंग लावून त्यावर शिकवले जाते.असे असेल तुम्ही कसले विश्वगुरू, परदेशात जाऊन दावे करण्यापेक्षा मूलभूत आणि हक्काच्या मुद्द्यावर आधी काम करा. अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावलें आहे.

सरकारी शाळा व्यवस्थित झाल्या तर काही खासगी शाळांचे व्यवसाय बंद पडतील. डोनेशन घेता येणार नाही आणि काही ट्रस्टच्या कारभारावरही परिणाम होईल. “यांना त्याचा त्रास आहे आणि हे सत्तेत बसलेले लोक आहेत,” असा आरोप त्यांनी केला. राजकीय रॅलीच्या वेळी ज्या पद्धतीने रस्ते स्वच्छ केले जातात, बॅनर लावले जातात आणि प्रशासन सक्रिय होते, त्याच पद्धतीने सरकारी शाळांचीही व्यवस्था सुधारली पाहिजे, असे दिपके यांनी म्हटले.

‘शाळा नीट करा, मगच मतदान’

सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या सुविधांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर सरकारने तातडीने लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. “तुम्ही आमच्या शाळा नीट करणार असाल, तरच आमचे मतदान तुम्हाला मिळेल,” असा इशारा अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच सत्ताधारी पक्षांच्या मित्रपक्षांना दिला.

 

 

 

Web Title: Abhijit dipke issues a direct warning to the state government after witnessing the dilapidated condition of schools in rural areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Student Protest

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम
1

Wardha News : वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप
2

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

Independence Day 2026 : तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये अन्.. ; गावची शाळा पाहून अभिजीत दिपकेंची नाराजी
3

Independence Day 2026 : तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये अन्.. ; गावची शाळा पाहून अभिजीत दिपकेंची नाराजी

CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल
4

CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.