Eknath Shinde Marathi Speech, Balasaheb Thackeray Marathi Bhasha Abhiyan
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासह विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठी-अमराठी वाद सातत्याने चर्चेत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा मुंबईसह राज्यातीस सर्व अमराठी रिक्षाचालक आणि इतर नागरिकांना मराठी बोलता आलं पाहिजे, अशी आग्रही मागणी करत आहेत. यावरून अनेकदा मुंबईत राजकारणही तापलेलं असते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या सुरूवातीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ” शिवसेनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या अभियानात १.२५ लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली हे अभियान केवळ समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे आव्हान स्वीकारले. त्यांनी कायद्याचा धाक न दाखवता प्रेमाने मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले. जे कायद्याने होऊ शकत नाही, ते प्रेमाने होऊ शकते,” असे सांगत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. दरम्यान, मराठी शिकण्यासाठी अद्यापही काही रिक्षाचालकांकडून सोशल मीडियावर विरोध व्यक्त केला जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियाव
सरनाईक म्हणाले की, “मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षाचालकांना आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात येईल. त्यानंतरही मराठी बोलता आली नाही, तर रिक्षाचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला. तसेच, आतापर्यंत १ लाख ६५ हजार रिक्षाचालकांनी मराठी शिकण्यासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ४० हजार अमराठी रिक्षाचालकांनी प्रशिक्षण घेतल्याचेही सरनाईक यांनी नमुद केले.
उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की, “रिक्षा-टॅक्सी चालकांनी केवळ व्यवहारापुरती मराठी न बोलता साहित्यिकांसारखी समृद्ध मराठी बोलावी, यासाठी पुढील उपक्रम राबवला जाईल. मराठी भाषा शिकल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज दिसत दिसते.