Action taken against unauthorized religious place in Kathe Galli area of Nashik, ban on gatherings imposed
नाशिक : नाशिकमधील एका धार्मिक स्थळावरुन वातावरण तापले आहे. हे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यात यावे अशी मागणी हिंदूत्ववादी संस्थांकडून केली जात आहे. नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये हे धार्मिकस्थळ आहे. यावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे. मागील 25 वर्षापासून हे प्रकरण सुरु असून वर्षानुवर्षे हिंदूत्ववादी संघटनायासाठी पाठपुरावा करत होती. आता मात्र महापालिका (Nashik NMC) अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले नाही तर हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.
नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे हा मुद्दा नाशिकमध्ये जोरदार तापण्याची शक्यता होतेय काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या परिसराला छावनीचे स्वरुप आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काठे गल्ली परिसरामध्ये हिंदूत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे नाशिक पालिकेसमोर अडचण निर्माण झाली. अखेर आंदोलनाच्यापूर्वी पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. काठे गल्ली परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकच्या या या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठे गल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून, वाहने पर्यायी मार्गाने नेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
वाहतुकीसाठी प्रवेश बंद
नाशिकमधील या कारवाईसाठी काही मार्ग हे बंद करण्यात आलए असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्सकडे जाणारा- येणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागजी चौक ते काठे गल्ली सिग्नल ते नागजी जाणारा-येणारा मार्ग, उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा जाणारा-येणारा मार्ग, पुणे हायवेने नाशिक रोडकडून द्वारकाकडे येणारा- जाणारा मार्ग, पंचवटीकडील महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारकाकडे येणारी वाहने, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून सव्र्व्हिस रोडने मुंबई नाक्याकडे येणारी वाहने, सारडा सर्कलकडून द्वारका सर्कलकडे येणारी सर्व वाहने आणि मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.