Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षांसह ३३०२ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला 'इतिहासातील सर्वात मोठे यश' म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 21, 2025 | 07:25 PM
भाजपचा सर्वात मोठा विजय; फडणवीसांनी मांडली विजयाची 'ब्लू प्रिंट' (Photo Credit - X)

भाजपचा सर्वात मोठा विजय; फडणवीसांनी मांडली विजयाची 'ब्लू प्रिंट' (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • टीका नाही, फक्त विकास!
  • फडणवीसांच्या ‘विकासाच्या ब्लू प्रिंट’ला जनतेची मोठी पसंती
  • विदर्भातील चित्र आणि मुनगंटीवारांची ‘खदखद’
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका आणि नगरपंचायती) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला असून एकट्या भाजपने १२९ नगराध्यक्ष आणि ३,३०२ नगरसेवक निवडून आणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले.
‘नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक 2025’मध्ये जनतेने भाजपाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार! आमचे विजयी उमेदवार सदैव आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असतील! सर्व उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा! #Maharashtra #BJPNo1 #NagarParishad2025… pic.twitter.com/6RnW7UL6e2 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 21, 2025


विजयाची आकडेवारी: महायुतीचा धडाका

या निवडणुकीत महायुतीने जवळपास सव्वा दोनशे जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे:

भारतीय जनता पक्ष (BJP): १२९ नगराध्यक्ष, ३,३०२ नगरसेवक (२०१७ च्या तुलनेत दुप्पट यश).

शिवसेना (शिंदे गट): ५४ नगराध्यक्ष.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ४० नगराध्यक्ष.

एकूण यश: महायुतीचे नगराध्यक्ष ७५ टक्क्यांहून अधिक आहेत.

हे देखील वाचा: Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा

“हा टीम भाजपचा विजय” – देवेंद्र फडणवीस

विजयाचा जल्लोष साजरा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला मिळाले नसेल, एवढे मोठे यश भाजपने मिळवले आहे. मी कोणत्याही सभेमध्ये कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही केवळ विकासाची ‘ब्लू प्रिंट’ मांडली आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. हा विजय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील टीम भाजपचा विजय आहे.”

विदर्भातील चित्र आणि मुनगंटीवारांची ‘खदखद’

नागपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. विशेषतः कामठीमध्ये ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद आणि पक्षप्रवेशाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर फडणवीस यांनी सूचक विधान केले. “सुधीरभाऊंना कुठे ताकद कमी पडली असेल, तर आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही त्यांना पूर्ण ताकद पुरवू. पक्षाची दारे सर्वांसाठी उघडी असली पाहिजेत, फक्त प्रवेश देणारी व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहावे लागेल,” असे फडणवीस म्हणाले. चंद्रपूर आणि गडचिरोलीत जिथे अपयश आले किंवा कमी मतांनी पराभव झाला, तिथल्या कारणांची मीमांसा केली जाईल आणि महापालिका निवडणुकीत ती कसर भरून काढली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे देखील वाचा: Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

Web Title: After bjps biggest victory fadnavis presented the blueprint for the victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Local Body Election
  • Mahayuti

संबंधित बातम्या

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल
1

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान
2

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान

Lonawala Result : लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा; १०,६८१ मतांनी राजेंद्र सोनवणे यांचा दणदणीत विजय
3

Lonawala Result : लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा; १०,६८१ मतांनी राजेंद्र सोनवणे यांचा दणदणीत विजय

Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार
4

Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.