जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
थंडीचे पोषक वातावरण लाभल्याने यंदा बटाट्याचे पीक जोमात आले आहे. उत्पादन आणि गळीत समाधानकारक असले तरी बाजारात मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये रात्रीच्या सुमारास मौल्यवान कॉपर केबल चोरी करणाऱ्या स्वामी चिंचोली येथील टोळीला कुरकुंभ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा प्रदेशचे माजी सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील यांची पक्षशिस्तभंग व पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरून भारतीय जनता पार्टीतून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे.
सोलापूरच्या राजकारणात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पार्टीने मोठा राजकीय दणका दिला आहे.
शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, काँग्रेसमधील दोन प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.