अंबादास दानवे यांची शिंदेंवर टीका (फोटो- सोशल मीडिया)
परळीमधील युतीवरून दानवेंची शिंदेंवर टीका
महानगरपालिका निवडणुकीआधी राजकारण तापले
परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची युती
Ambadas Danve On Eknath Shinde: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 तारखेला निकल जाहीर होणार आहे. राज्यात महायुतीमधील पक्ष आणि महाविकास आघाडीमधील पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. वेगवेगळ्या युती झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्यातच परळी परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची युती झाल्याने ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीआधी राजकारण तापले आहे. महानगरपालिका निवडणुकीआधी अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता एकच खळबळ उडाली आहे.
अंबादास दानवे यांचे ट्वीट काय?
एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीचीजी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या ‘बंड’ आणि ‘तत्त्वांच्या’ गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट ‘एमआयएम-वासी’ झालात?
एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या ‘बंड’ आणि ‘तत्त्वांच्या’ गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट ‘एमआयएम-वासी’ झालात?
ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच… — Ambadas Danve (@iambadasdanve) January 9, 2026
ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या ‘सत्तेच्या संसाराचा’ चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक.
मंगल प्रभात लोढांचा ठाकरें बंधूंविरोधात आक्रमक पवित्रा
राज्यामध्ये 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला निकाल हाती येऊन चित्र स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी सोयीस्कर युती केल्याने राजकारण तापले. पालिका निवडणुकीसाठी दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. यामुळे काँग्रेसने जोरदार टीका केली. मात्र आता अंबरनाथमध्ये कॉंग्रेसने चक्क भाजपसोबत हातमिळवणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कॉंग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर आक्षेप घेत जोरदार टीकास्त्र डागले.






