वारिस पठाण यांची जीभ घसरली, नितेश राणेंच्या विधानावरून नवा वाद (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधताना AIMIM चे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांची चक्क जीभ घसरली आपला संयम घसरून ते म्हणाले की, महाराष्ट्रात काही भाजपचे लोक आहेत जे धर्म आणि भाषेच्या नावाखाली द्वेष आणि अराजकता पसरवत आहेत. अशा लोकांना रोखण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आहे. हा तोच माणूस आहे ज्याने मुस्लिमांविरुद्ध इतके कठोर शब्द बोलले की ‘आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला करू.’ या विधानावर आता वारिस पठाण यांनी हल्लाबोल केलाय आणि नितेश राणे यांना एक प्रकारची धमकीच दिल्याचे दिसून येत आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
‘तुम्ही दोन पायांवर याल पण स्ट्रेचरवर जाल’ – वारिस पठाण
या विधानावर वारिस पठाण म्हणाले की, “तेव्हाही आम्ही तुम्हाला मशिदीत येण्याचे आव्हान दिले होते. तुम्ही दोन पायांवर याल पण स्ट्रेचरवर जाल. मुस्लिमांविरुद्ध अशा प्रकारे विष ओकल्याबद्दल त्याला आधीच बक्षीस मिळाले आहे. त्यासाठी त्याला मंत्री बनवण्यात आले आहे. आता तो येतो आणि म्हणतो की मदरशांमध्ये हे शिकवा, ते शिकवा. भाऊ, असे म्हणणारे तुम्ही कोण? संविधानाने प्रत्येकाला स्वतःचा धर्म पाळण्याची परवानगी दिली आहे.” प्रत्येक माणूस प्रत्येक भाषेचा आदर करतो’
Maharashtra Politics : ‘नितेश राणे जरा जपून बोला…’; मोठ्या राणेंनी धाकट्या राणेंचे टोचले कान
वारिस पठाण यांनी म्हटले स्टंटवर्क
IANS वृत्तसंस्थेशी बोलताना AIMIM नेते पुढे म्हणाले की, “भाषेचा विचार केला तर, प्रत्येक माणूस प्रत्येक भाषेचा आदर करतो. आपण भारतीय आहोत. भारतात प्रत्येक भाषेचा आदर केला जातो. सर्व जाती आणि धर्मांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मदरशांमध्ये तुम्हाला हेच मिळते किंवा तेच मिळते, नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे? इतके खोटे आणि द्वेष पसरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे सर्व स्टंटवर्क निवडणुकीपूर्वी घडत आहे.”
मुख्यमंत्र्यांना वारिस पठाणांचा सवाल
यासोबतच वारिस पठाण यांनी मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारला आहे की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का बसले आहेत? याचे आम्हाला वाईट वाटते? ते अशा लोकांना का रोखत नाहीत जे दररोज मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत? या लोकांना थांबवले पाहिजे. आपल्याला राज्यात शांतता राखावी लागेल. हे लोक पूर्णपणे अराजकता पसरवत आहेत, द्वेष पूर्णपणे पसरवण्याची चर्चा आहे. आम्हाला असे वाटते की भाजपने अशा लोकांच्या जिभेवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून महाराष्ट्रात वातावरण टिकून राहील.” आता यावर पुन्हा नितेश राणे यांचा पलटवार काय असणार हे पहावे लागेल.
वारिस पठाण यांचा व्हिडिओ
Mumbai, Maharashtra: On Minister Nitesh Rane’s statement that Marathi should be taught in madrasas, AIMIM leader Waris Pathan says, “In Maharashtra, some BJP leaders are spreading hatred in the name of religion and language, creating unrest. It is the responsibility of the Chief… pic.twitter.com/NLZ9K9ZcMD
— IANS (@ians_india) July 15, 2025