Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death Conspiracy: घातपाताची शंका बळावली? मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्र सरकारचा नकार

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी शंका व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यानीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 21, 2026 | 11:00 AM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Follow Us
Close
Follow Us:
  • विमान अपघाताबाबत संपूर्ण राज्यात संशयाचे वातावरण
  • अजित पवार ‘देवगिरी’ या शासकीय निवास्थानावरून मंत्रालयापर्यंत कोणत्या मार्गाने गेले
  • रोहित पवार, जय पवार यांच्याकडूनही घातपाताचा संशय व्यक्त
 

Ajit Pawar Death Conspiracy:  महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संपूर्ण राज्यात संशयाचे वातावरण आहे. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते नितीन यादव यांनी त्या दिवसाचे मुंबई विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते, परंतु केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे अपघातातील घातपाताची शंका अधिक बळावली असून, यादव यांनी आता हे प्रकरण न्यायालयात नेले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी अजित यांचा विमान अपघात झाला होता. त्या दिवशी सकाळी ६ ते ९ या वेळेत मुंबई विमानतळावर काय हालचाली झाल्या, हे जाणून घेण्यासाठी नितीन यादव यांनी १० फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता.

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अपील आणि न्यायालयीन कारवाई

फुटेज देण्यास नकार दिल्यानंतर यादव यानी प्रथम अपील दाखाल केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय माहिती आयुक्तांच्या विविध निकालाचा दाखला देत पुन्हा फुटेजची मागणी केली आहे. तसेच, त्या दिवशी सकाळी ६ ते ९ दरम्यान अजित पवार ‘देवगिरी’ या शासकीय निवास्थानावरून मंत्रालयापर्यंत कोणत्या मार्गाने गेले, याचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे यासाठी स्वतंत्र अर्ज केला आहे.  (Ajit Pawar Plane Crash )

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे ..

अपघाताबाबत वाढता संशय

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी शंका व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यानीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ सहजासहजी नष्ट होत नाही मग सत्य समोर का येत नाही? VSR  कंपनीच्या विमानांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि त्यांच्या विमानांच्या देखभालीतील संभाव्य निष्काळजीपणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.

 

रोहित पवारांकडूनही घातपाताचा संशय

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही सातत्याने अजित पवार यांचा विमान अपघात हा निव्वळ योगायोग नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात असल्याचा संशय व्यक्त करतआहेत. त्यासंदर्भात त्यांनी खुली पत्रकार परिषद घेऊन अनेक पुरावेदेखील मांडले आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या अपघाती विमानातील ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर आला. त्यात ब्लॅक बॉक्सचे जळाल्यामुळे खूप नुकसान झाल्याचेही सांगण्यातआले आहे. पण याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवस आणि आदल्या दिवशीचे काही संदर्भ दिले आहेत. याशिवाय त्यांनी विमान कंपनीच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच विमानाच्या पायलटचा वापर करून हा अपघात घडवून आणल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Web Title: Ajit pawar death conspiracy central government refuses to provide cctv footage from mumbai airport on the day of ajit pawars accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Central Governement

संबंधित बातम्या

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
1

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन
2

Indian Railway: भारतीय रेल्वेचा कायापालट! २०२६-२७ मध्ये येणार सातव्या पिढीची रेल्वे इंजिने; जाणून घ्या पूर्ण प्लॅन

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!
3

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.