Ajit Pawar plane crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत तपास ब्युरोची मोठी अपडेट समोर
Ajit Pawar Plane Crash Black Box: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपघातासंदरर्भात विमान अपघात ब्यरोकडून पहिल्यांदाच महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डवर आगीचा दुष्परिणाम झाल्यामुळे रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळही माजली असून पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ( Ajit Pawar plane Accident)
विमान अपघात तपास ब्युरोकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, विमान कोसळल्यामुळे विमानाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अजित पवार यांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे या रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरो यशस्वी झाली . कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचा डेटा रिकव्हर कऱण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. हे रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे. तर्कवितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन तपास ब्युरोकडून देण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅडर्डनुसार तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. (Ajit Pawar Plane Crash )
Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात …
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे साहित्य मानले जाते. ब्लॅक बॉक्स हे रेकॉर्डिंग डिव्हाईस असून. त्यात विमान उड्डाणादरम्यान, कॉकपीटमध्ये झालेल्या संभाषणाची आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केला जातो. ब्लॅक बॉक्सचे नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी प्रत्यक्षात मात्र तो नारंगी रंगाच असतो. त्यावर आगीचा किंवा पाण्याचा कोणताही परिणा महोत नाही. विमान अपघातानंतर आणि त्याचा तपासासाठी एका टीमला खास प्रशिक्षण दिलेले असते, ती टीम ब्लॅक बॉक्समधील डेटा गोळा करण्याचे काम करते. या टीममध्ये अनेकदा नौदल किंवा विशेष बचाव पथकेदेखील सहकार्य करतात.
अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर येणार? केंद्रीय …
दिवंगत अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात हा घातपात असू शकतो. असा संशय व्यक्त केला आहे. अपघाताला २० दिवस उलटल्यानंतरतही तपासाला वेग आला नाही. केवळ सीसीटिव्ही फुटेज च्या आधारे तपास सुरू आहे. VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून जाणीवपूर्वक उशीर केला जात नाहीये ना, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. तसेच या कंपनीवर कुणाचा वरदहस्त आहे. अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. त्यातच आज ब्लॅक बॉक्सबाबत जी माहिती समोर येत आहे. त्यावरून मी पाच दिवसांपूर्वी वर्तवलेली शंका खरी होताना दिसत आहे. असो, पण आम्ही मात्र अजितदादांचा अपघात झाल की घातपात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.






