Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का; तब्बल 600 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र पुण्यामध्ये अजित पवारांच्या पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये दीपक मानकर यांना संधी न दिल्यामुळे नाराजी आहे. यामुळे 600 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देखील दिला आहे. यावरुन आता पुण्यामध्ये राजकारण रंगले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 16, 2024 | 11:56 AM
pune deepak mankar upset on ajit pawar

pune deepak mankar upset on ajit pawar

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा जाहीर होण्यापूर्वी शेवटच्या क्षणाला राज्यपाल नियुक्त आमदारांची घोषणा करण्यात आली. महायुतीमधील सात नेत्यांचा विधीमंडळामध्ये शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये तीन भाजप तर शिंदे गट व अजित पवार गट यांचे प्रत्येकी दोन दोन नेत्यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. मात्र यामुळे पुण्यामध्ये अजित पवार गटामध्ये नाराजी सूर उमटला आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी न दिल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.

पक्षामध्ये अजित पवारांनी वेगळा विचार केल्यानंतर दीपक मानकर हे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष बनले आहेत. पुणे शहरामध्ये दीपक मानकर यांचा मोठा समर्थक वर्ग असून त्यांनी शहरामध्ये अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे. मात्र अजित पवार गटाकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दोन नावांची शिफारस करण्यात आली. यामध्ये दीपक मानकर यांचे नाव नसल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. यावेळी दीपक मानकर यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे.

हे देखील वाचा : वेळ पडल्यास मीदेखील उमेदवारीवर पाणी सोडेन; असं का म्हणाले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे?

मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षांचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. याच पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आपल्या राजीनाम्यातून नाराजी जाहीर केली आहे. मानकरांच्या समर्थकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. सहाशे समर्थकांनी राजीनामे दिल्याचा दावा केला जातो आहे.

एका वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबात किती पदं देणार, असे म्हणत अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे दीपक मानकर यांचे समर्थक नाराज झाले आहेत. यापूर्वी अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. महिला प्रदेश अध्यक्षपद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीला दिल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांना देखील लक्ष्य केले होते. त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर पुण्यातील नेते नाराज असल्याचे उघड झाले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र नक्कीच अजित पवारांचे टेंन्शन वाढवणारे आहे.

Web Title: Ajit pawar pune deepak mankar upset for not given mla appointed by the governor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
1

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.