
Akluj Municipal Council Election, Akluj News Today,
Shivsena & MNS seat sharing: ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी
या उलट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शांत व संयमाने निवडणुकीची व्यूह रचना करीत १३ प्रभागातील २६ उमेदवार व नगराध्यपदाच्या उमेदवार रेश्मा अडगळे यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती . विजय चौकातील शेवटच्या सभेत त्यांनी आवेशपूर्ण परंतु आपल्या संयमी भाषणाद्वारे अकलूजकरांच्या काळजाला हात घातला होता.
२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर अकलूज नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यातूनच गोरडवाडीचे भाजपचे कार्यकर्ते बाबा तरंगे यांनी मोहिते पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते मच्छिंद्र माणिकराव कर्णवर यांच्या बरोबर बुलेटची पैज लावली. या पैजेची चर्चा समाज माध्यमावर खूप रंगली. या पैजेवर प्रतिक्रिया देताना आ. उत्तमराव जानकर यांनी मात्र एक नव्हे शंभर बुलेटच्या पैजा लावल्या तरी अकलूजमध्ये मोहिते पाटीलच जिंकणार अशी ग्वाही देत पैजेतील हवाच काढली होती.
२१ डिसेंबरला मतमोजणी सुरु असतानाच पहिला निकाल सकाळी ११ वाजता जाहीर झाला. या निकालात मोहिते पाटील गटाच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार रेश्मा अडगळे या १३०० मतांनी आघाडीवर तर १४ उमेदवार विजयी असा निकाल जाहीर झाला. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच अकलूजसह तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. भाजपच्या ज्या कार्यकर्त्याने बुलेटची पैज लावली त्याचा फोन मात्र स्वीच अप झाल्याचे मच्छिंद्र माणिकराव कर्णवर यांनी सांगितले.
कर्णवर म्हणाले, आपली तिसरी पिढी मोहिते पाटील घराण्याबरोबर काम करीत आहे. मोहिते पाटील यांचे राजकारण, समाजकारण आम्ही जवळून पाहिले आहे. त्यामुळे अकलूज नगर परिषदेत मोहिते पाटीलच जिंकणार हा आत्मविश्वास होता म्हणूनच मी ही पैज लावली. बाबा तरंगे हे जरी भाजपचे काम करीत असले तरी माझे मित्र आहेत . राजकारण वेगळे व मैत्री वेगळी असते. मला बुलेट मिळाली नाही तरी चालेल पण माझा आत्मविश्वास जिंकला याचे मोठे समाधान आहे.
मच्छिंद्र कर्णवर यांनी आज सदाशिवनगर येथे मोहिते पाटील परिवाराची भेट घेतली त्यावेळी त्यांचा अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी फेटा बांधून सत्कार केला. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील, आ रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, शिवंशिका मोहिते पाटील, संचालक ॲड सुरेश पाटील, महादेव शिंदे , दादा पाटील, सुनील माने, रामदास करणे, सुधाकर पोळ, मच्छिंद्र गोरड , विष्णुपंत वाघमोडे आदी उपस्थित होते.