Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज

महाराष्ट्रात यूसीसी लागू करण्यासंदर्भात घडामोडींना वेग येताच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 07:20 AM
शाहांच्या घोषणेनंतर रालोआत कलह

शाहांच्या घोषणेनंतर रालोआत कलह

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरिक कायद्याबाबत (यूसीसी) केलेल्या घोषणेनंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. भाजपच्या मित्रपक्षांनीही या मुद्द्यावर सावध भूमिका घेत इशारा देण्यास सुरुवात केली आहे. आंध्र प्रदेशात सत्तेत असलेल्या तेलगू देसम पार्टीचे संसदीय दलाचे नेते कृष्ण देवरायालू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, यावर चर्चा झालेली नाही. परंतु गरज भासेल तेव्हा यावर विचार केला जाईल आणि हा कायदा स्वीकारण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी निश्चितपणे चर्चा केली जाईल.

बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा घटक असलेल्या जेडीयूने या मुद्द्यावर अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. भाजपचा आणखी एक सहयोगी पक्ष लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनीही सावध पवित्रा घेतला आहे. ‘आमचा पक्ष एकरूपता आणि विविधता या दोघांसाठीही कटिबद्ध असून संविधानाने विविध समुदायांच्या परंपरांना मान्यता दिली आहे’, असे त्यांनी नमूद केले. यूसीसीचा मसुदा सार्वजनिक केला पाहिजे, संबधित घटकांच्या हितांचा विचार झाला पाहिजे आणि व्यापक चर्चा झाली पाहिजे, त्यानंतरच पक्ष आपली अंतिम भूमिका स्पष्ट करेल, असे पासवान यांनी सांगितले.

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’

दरम्यान, महाराष्ट्रात यूसीसी लागू करण्यासंदर्भात घडामोडींना वेग येताच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या घोषणेनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी हिवाळी अधिवेशनात यूसीसी विधेयक आणण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार धर्मसंकटात सापडल्या आहेत.

राष्ट्रवादीने भूमिका तात्काळ जाहीर करावी

राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील मुस्लिम आमदार इद्रीस नायकवडी यांनी सुनेत्रा आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. नायकवडी यांनी सुनेत्रा आणि तटकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर आधारित पक्ष आहे; त्यामुळे यूसीसीबाबत पक्षाने आपली अधिकृत भूमिका तात्काळ स्पष्ट करावी.

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला

Web Title: Along with the jdu chandrababu naidu and paswan are also upset over the ucc issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Amit Shah

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला
1

Devendra Fadnavis : ‘अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर थोबाडं काळी झाली असती’; फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
2

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?
4

‘भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत अन्न…’; काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.