
Amit Shah NCP Leaders Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सहा प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या भेटीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. लक्षणीय बाब म्हणजे या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हेच उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. या भेटीत पक्षाची महाराष्ट्रातील राजकीय रणनीती आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर घंटानाद, निदर्शने अन् बेमुदत धरणे
मुंबईत कोअर कमिटीची बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणे, संघटनात्मक परिस्थितीवर चर्चा करणे आणि आगामी राजकीय रणनीती ठरवणे, हे या बैठकीचे प्रमुख मुद्दे असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार आणि तीन वेळा विधान परिषद सदस्य राहिलेले सतीश चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
या निकालानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे म्हटले होते. विधान परिषद निवडणुकीचे निकाल हा स्पष्ट आणि तातडीचा इशारा असल्याचे सांगत, जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी पक्षाच्या प्राधान्यक्रमांची पुनर्रचना आणि संघटनात्मक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा;
दरम्यान, पक्षातील अंतर्गत कलहाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांमध्ये विजय आणि पराभव होत असतात. मात्र, पराभव झाल्यानंतर आत्मपरीक्षण करणे आवश्यक असून, पक्ष निश्चितपणे त्यावर विचार करेल, असेही त्यांनी सांगितले होते.
आता अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक आणि मुंबईत होणारी कोअर कमिटीची बैठक या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: या भेटीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे ६ प्रमुख नेते उपस्थित होते.
Ans: विधान परिषद निवडणुकीतील सतीश चव्हाण यांच्या पराभवानंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणे, संघटनात्मक पुनर्रचना करणे आणि आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी ही कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे.
Ans: प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे निकाल पक्षासाठी एक तातडीचा इशारा (Wake-up call) असल्याचे म्हटले होते आणि पक्षाला तातडीने आत्मपरीक्षण तसेच संघटनात्मक सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.