
NCP Leaders meet Amit Shah
NCP News : राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला अपयश आल्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याच्या चर्चा आहेत. अश्यातच, आता मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादीच्या टॉपच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे या भेटीवेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांनी नवी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. राष्ट्रवादीतील एवढे महत्त्वाचे नेते एकाच वेळी शाहांच्या भेटीला पोहोचल्याने या भेटीमागचं नेमकं कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
अश्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पवार यांनी याबाबत भाष्य करत या भेटीमागील कारण स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या काळातील काही विषय तसेच राज्यातील काही महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने हि पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली होती, असे उमेश पवार यांनी स्पष्ट केले.
Six leaders from the NCP Ajit Pawar faction– Dhananjay Munde, Sunil Tatkare, Praful Patel, Hasan Mushrif, Chhagan Bhujbal, and Dilip Walse Patil met Union Home Minister Amit Shah in Delhi today. https://t.co/PbtTv27CXP — ANI (@ANI) November 2, 2026
या भेटीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची अनुपस्थिती. पक्षातील वरिष्ठ नेते अमित शाहांना भेटत असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच या बैठकीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीत नेतृत्वाच्या पातळीवर काही वेगळंच समीकरण तयार होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यावरूनच उमेश पवार यांनी याबाबतही स्पष्टीकरणही दिले आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ आपली भेट घेणार असल्याचं अमित शाह यांना कळवलं होतं. त्यानुसार वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट सुनेत्रा पवारांच्या आदेशानेच झाली असल्याचं उमेश पवार यांनी स्पष्ट केलं.
https://t.co/Pf0NLspeZR — MahaNCPspeaks (@mahancpspeaks) November 2, 2026
विधान परिषद निवडणुकीतील अपयशानंतर प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भूमिकेमुळेही पक्षातील नाराजीची चर्चा सुरू झाली होती. पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीकडे केवळ औपचारिक भेट म्हणून पाहिलं जात नाहीये.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात निवेदनही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
आता या भेटीनंतर राज्यातील राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Ans: सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या सात नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली.
Ans: नाही. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या भेटीला उपस्थित नव्हते.
Ans: सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. मात्र, भेटीमागील नेमका उद्देश आणि चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.