Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, डीलिमिटेशनवरही सवाल

शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी सवाल उपस्थित करत भाजपच्या डीलिमिटेशनच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 09:11 PM
Ambadas Danve

Ambadas Danve

Follow Us
Follow Us:
  • ‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’ असा दानवेंचा टोला.
  • महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा मुख्य हेतू मतदारसंघांची पुनर्रचना असल्याचा दावा.
  • फडणवीस-जयंत पाटील या दोघांचा कार्यक्रम नियोजित असल्याने एकत्र प्रवासात गैर काही नाही – दानवे
 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पवार गटाच्या खासदारांच्या मोदी भेटीवर बोचरी टीका केली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्याचा संदर्भ देत दानवे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमधील या भेटीगाठींवर प्रश्न उपस्थित केला.

‘मोदींना भेटून काय बदलणार?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देशातील सामान्य जनतेच्या परिस्थितीत काय बदल होणार, असा सवाल दानवे यांनी केला. “पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?” असा टोला त्यांनी लगावला. देशातील कोणता घटक सध्या सुखी आहे, असा प्रश्न उपस्थित करत केवळ पंतप्रधानांची भेट घेतल्याने जनतेच्या प्रश्नांचं निराकरण होणार आहे का, असंही दानवे म्हणाले.

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

डीलिमिटेशनच्या मुद्द्यावर भाजपला घेरलं

दरम्यान, डीलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला राजकीय भीती वाटत असल्याचा दावा करत डीलिमिटेशनच्या मुद्द्यावर एवढा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल त्यांनी केला.

महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झालं असतानाही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असं दानवे म्हणाले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध असल्याचं चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“तुमचा मुख्य हेतू डीलिमिटेशन आहे, महिला आरक्षण नाही,” असा दावा करत काही भागांमध्ये खासदारांची संख्या वाढवणे आणि काही भागांमध्ये कमी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिंदे गटाच्या ‘सिंदूर’ उपक्रमावर टोला

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सिंदूर रक्तदान शिबिराबाबतही दानवेंनी सवाल उपस्थित केला. देशातील महिलांच्या आयुष्याशी संबंधित भावनिक मुद्द्यांचा राजकीय वापर करण्यावर त्यांनी टीका केली.

एकनाथ शिंदे यांचा दिल्लीशी नेमका काय संबंध आहे, असा सवाल करत दानवे यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली.

जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी “जीव देऊ शकतो आणि जीव घेऊही शकतो” असं वक्तव्य केल्याबाबत विचारलं असता दानवे यांनी वेगळी भूमिका मांडली. जीव देण्याची किंवा घेण्याची गरज नसून समाजाच्या प्रश्नांसाठी चांगल्या पद्धतीने जगण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील सातत्याने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढा देत असल्याचंही दानवेंनी नमूद केलं.

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

फडणवीस-जयंत पाटील यांच्या विमान प्रवासावरही भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याबाबतही दानवेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांच्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांचा कार्यक्रम नियोजित होता, त्यामुळे त्यांनी एकत्र प्रवास केला असावा, असं दानवे म्हणाले. प्रवासाची साधनं मर्यादित असल्यामुळे दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला असेल, त्यात फार काही वावगं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एकूणच, पवार गटाच्या खासदारांची मोदी भेट, डीलिमिटेशनचा मुद्दा, शिंदे गटाचा दिल्लीतील उपक्रम आणि फडणवीस-जयंत पाटील यांच्या विमान प्रवासावरून अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Web Title: Ambadas danve criticism sharad pawar mps pm modi meeting delimitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • NCP Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : बळीराजाची चिंता वाढली! दुष्काळाबाबत ‘या’ महिन्यात होणार निर्णय, खुद्द मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती
1

Maharashtra Drought : बळीराजाची चिंता वाढली! दुष्काळाबाबत ‘या’ महिन्यात होणार निर्णय, खुद्द मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.