Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

खासदार संजय जाधव काजू-बदाम खातानाच्या व्हिडीओवरुन आंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवेसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या अशाच वक्तव्यामध्ये दानवे यांनीही आपला सूर मिसळला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 20, 2026 | 03:46 PM
शेतकरी आत्महत्या करतोय अन्...; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

शेतकरी आत्महत्या करतोय अन्...; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्याच्या विविध भागांत दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवा लावण्यासाठी तेल नाही, मात्र दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत सत्ताधारी काजू-बदाम खात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. खासदार संजय जाधव काजू-बदाम खातानाच्या व्हिडीओवरुन त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवेसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या अशाच वक्तव्यामध्ये दानवे यांनीही आपला सूर मिसळला आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळे, शिवसेना शाखा, पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शनिवारी दानवे यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे बैठक झाली. या बैठकीत खासदार संजय जाधव काजू-बदाम खात असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याचा दावा दानवे यांनी केला. ‘‘दुष्काळात शेतकऱ्यांची अवस्था बिकट असताना लोकप्रतिनिधींचे असे वर्तन दुर्दैवी आहे. अल्पोपहार घेण्यास हरकत नाही; मात्र काजू-बदाम खाणाऱ्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

‘‘ब्रिटिशांच्या काळात नागरिकांवर अन्याय होत होता. त्याच पद्धतीने सत्तेतील लोक जनतेशी वागत असल्याचे चित्र दिसत आहे. असंवेदनशील लोकप्रतिनिधी निवडून येणे हे राज्याचे दुर्दैव आहे,’’ अशी टीकाही दानवे यांनी केली. राज्यातील शेतकरी संकटात आहे. अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, धो-धो पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जनता धडा शिकवो, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली, असे दानवे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

काजू बदामावरून संजय शिरसाटही संतापले

नांदेड येथे मराठवाडा विभागीय दुष्काळ आढावा बैठकीदरम्यान नेत्यांच्या ताटात काजू-बदाम ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीत, जिथे खरीप हंगाम वाया गेला आहे आणि शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत, अशावेळी अधिकाऱ्यांनी हा अनावश्यक पाहुणचार केल्याने नेत्यांना बदनामी सहन करावी लागते, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. यात संजय जाधव यांच्या काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ विशेषतः व्हायरल झाला. शिरसाट यांनी या कृतीला पाहुणचार नसून, अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली गैरकृत्ये ठरवले आणि ते विभागीय आयुक्तांशी या संदर्भात बोलणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असताना आणि शेतकरी साधी चटणी-भाकरी खाऊन दिवस काढत असताना, नेत्यांच्या ताटात दिसलेल्या काजू-बदामामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे.

Web Title: Ambadas danve was furious because sanjay jadhav ate cashews and almonds during the drought review meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • pune news
  • shivsena

संबंधित बातम्या

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
1

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
2

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
3

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
4

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.