Ambadas Danve targets Arjun Khotkar over cash found in a rest house in Dhule crime news
सोलापूर : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे चर्चेमध्ये आले आहेत. धुळे विश्रामगृहामध्ये विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी पाच कोटी रुपये आढळले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. विधीमंडळ अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर हे सध्या धुळे दौऱ्यावर आहेत. त्यांच्याच स्वीय सहाय्यकाच्या खोलीमध्ये पाच कोटी रुपये आढळल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे प्रकरण ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहेत. तसेच धुळ्यामध्ये आढळलेल्या रोकडवरुन अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “मागच्या काळात 10-12 लाख रुपयांच्या प्रकरणात संजय राऊत यांची ED चौकशी केली, त्यांना 100 दिवस जेलमध्ये ठेवलं. जरं एखाद्या विश्रामगृहात दीड दोन कोटी रुपये एका रूमध्ये असतील तर कोणाच्या नावावर रूम आहे, तिथले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अटक करण्यात आली पाहिजे,” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “जरं समितीसाठी हे पैसे असतील तर हे अतिशय गंभीर आहे. जनतेची कामे सुरळीत व्हायला पाहिजे, राज्य सरकार सगळीकडे लक्ष ठेवू शकतो नाही म्हणून समिती असतात. जरं ह्या हेतूलाच समिती हरताळ फासत असतील तर याची चौकशी झाली पाहिजे, एवढ्या रकमा कुठून येतात याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे. ही रक्कम कोणाची याची चौकशी झाली पाहिजे. जरं अधिकाऱ्याची असेल तर अधिकाऱ्याची अर्जुन खोतकरांची असेल तर त्यांच्यावर करवाई व्हायला पाहिजे,” असे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येची चर्चा राज्यभर आहे. सासरच्या जाचासा कंटाळून तिने आत्महत्या केली. तिचे सासरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले की, “आपलं राज्य हे फुले शाहू आंबेडकरांचे आपण म्हणतो. सावित्रीबाई, आहिल्यादेवी जिजाऊचे आदर्श आपल्याकडे आहेत. असे असताना हुंड्यावरून एखाद्या महिलांचे छळ होतो हे हृदयाला पीळ आणणारी गोष्ट आहे, ही विषवल्ली ठेचली पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पदाधिकारी कोणत्या पक्षाचे याला काही महत्व नाही, ही वृत्ती बरोबर नाही. कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो पक्ष तसा असं मानायची काही गरज नाही. जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अजित पवारांच्या हस्ते चावी दिली म्हणून काय झालं? इथं मी आलो माझ्या हस्ते काही देतात. मला यात राजकारण आणायचे नाही, अजित पवार असतील किंवा त्यांच्या पक्ष असेल मला देनेघेणे नाही. जगात हुंड्यासाठी एका भगिनीचा छळ होतो, तर ही वृत्ती ठेचली पाहिजे. चावी कोणी दिली? अजित पवरांनी दिली म्हणून ते दोषी हे काय मला पटत नाही,” असे म्हणत अंबादास दानवे यांनी या प्रकरणामध्ये राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.