Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात’; राज ठाकरेंच्या टीकेला अमित साटम यांचा पलटवार, ‘फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट केलं जातंय’

राज ठाकरे यांच्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात, आम्ही रस्त्यावर उतरून काम करत आहोत,' असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jul 04, 2026 | 06:22 PM
'काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात'; राज ठाकरेंच्या टीकेला अमित साटम यांचा पलटवार

'काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात'; राज ठाकरेंच्या टीकेला अमित साटम यांचा पलटवार

Follow Us
Follow Us:

मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दुर्घटनांवरील एका व्हायरल व्हिडिओवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या कथित असंवेदनशील वर्तनावर टीका केली होती. त्यानंतर आता अमित साटम यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतील विविध भागांचा दौरा करून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अमित साटम यांनी विरोधकांवर निशाणा साधला. प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, तसेच सर्व भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मैदानात उतरून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात’

राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना अमित साटम म्हणाले, “काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात. गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी पावसात रस्त्यावर उतरून काम करताना पाहिलं आहे का?”

‘तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?’ अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र; ‘लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कारवाई करा’

ते पुढे म्हणाले, “आमचे महापौर गल्लोगल्ली फिरत आहेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून मुंबईकरांची सेवा करत आहोत. मात्र काही लोक फक्त सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यापुरतेच मर्यादित आहेत.”

‘फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट केलं जात आहे’

व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत अमित साटम यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. “त्या घटनेबाबत मी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून फेक नरेटिव्ह पसरवून मला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना ते करू द्या,” असे ते म्हणाले.

विरोधक माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत. आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. विधानसभेत आवाज उठवून आम्ही २ दिवसांत ७ मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले! पावसात कधी उद्धव, आदित्य किंवा राज ठाकरेंना मुंबईकरांनी रस्त्यावर पाहिले आहे का?… pic.twitter.com/cRSsKB0CzF — Ameet Satam (@AmeetSatam) July 4, 2026

महापालिकेच्या राजकारणावरूनही आरोप

अमित साटम यांनी यावेळी महापालिकेच्या राजकारणाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे दोन्ही पक्ष, ज्यांनी पूर्वी युती केली होती, त्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील समन्वयासाठी आम्हाला संपर्क केला होता. मात्र आम्ही तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळेच त्यांचा राग अनावर झाला आहे.”

ते पुढे म्हणाले, “२५ वर्षे जे लाभ त्यांना मिळत होते, ते आता मिळत नाहीत. त्यामुळेच ते नाराज असून त्या नाराजीतून मला लक्ष्य केलं जात आहे.”

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

‘भ्रष्टाचारमुक्त मुंबईसाठी आम्ही कटिबद्ध’

मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाबाबत बोलताना अमित साटम म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही मैदानात उतरून काम करत राहू.”

दरम्यान, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुरू झालेला वाद अद्याप कायम असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे.

Web Title: Ameet satam replies to raj thackeray over mumbai rain row

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • amit satam
  • BMC
  • Mumbai Rain
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

Mumbai Protest: राज-उद्धव ठाकरे एकत्र; निवडणूक आयोगाविरोधात आझाद मैदानात आंदोलन
1

Mumbai Protest: राज-उद्धव ठाकरे एकत्र; निवडणूक आयोगाविरोधात आझाद मैदानात आंदोलन

‘स्वतःचं अपयश लपवण्यासाठी..,’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी रामदास कदमांचं मोठं वक्तव्य; ठाकरे बंधूंवर निशाणा
2

‘स्वतःचं अपयश लपवण्यासाठी..,’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी रामदास कदमांचं मोठं वक्तव्य; ठाकरे बंधूंवर निशाणा

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.