Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज ठाकरेंच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज’; अमित साटमांचा जोरदार पलटवार

राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासण्याची केलेली टीका भाजपने जोरदारपणे परतवून लावली आहे. अमित साटम यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 01, 2026 | 04:56 PM
'राज ठाकरेंच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज'; अमित साटमांचा जोरदार पलटवार

'राज ठाकरेंच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज'; अमित साटमांचा जोरदार पलटवार

Follow Us
Follow Us:
  • राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अमित साटम यांचा पलटवार
  • मनसेच्या राजकीय अस्तित्वावर भाजपची टीका
  • उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवरही साधला निशाणा
 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील “फिंगरप्रिंट तपासावेत” अशी केलेली टीका आता राजकीय वादाचा नवा विषय ठरली आहे. या वक्तव्याला उत्तर देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करत, “त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे,” अशी टीका केली.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित साटम म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचे सध्या ना विधानसभा, ना लोकसभेत प्रतिनिधित्व आहे. मुंबई महानगरपालिकेतही मर्यादित संख्येने नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय कामगिरीचा आढावा त्यांनी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या भाषणशैलीवर टीका करत साटम म्हणाले की, “आरोप-प्रत्यारोप करणे हे त्यांच्यासाठी नवीन नाही. ते केवळ कार्यकर्त्यांसमोर भाषणे करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. फक्त टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी,” असेही त्यांनी म्हटले.

Raj Thackeray: ‘मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,’ राज ठाकरेंचा हल्लाबोल

मराठी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना साटम यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप इंडिया आणि एमएसएमईसारख्या उपक्रमांमुळे लाखो युवकांना रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचा उल्लेख करत त्यांनी विकासाच्या विषयांवर चर्चा करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी शिवउद्योगच्या माध्यमातून मनसेने किती मराठी युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, याचाही हिशेब राज ठाकरे यांनी द्यावा, असे आव्हान दिले. “फक्त अभिनय आणि उपरोधिक टीका करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ चर्चेला सामोरे जावे,” असेही त्यांनी म्हटले.

अमित साटम यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षातील मोठ्या प्रमाणावर आमदारांनी साथ सोडल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मुंबई महानगरपालिकेतील कारभाराबाबतही त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

Sanjay Raut News: २०२९ च्या आधीच राजकीय बाजार उठलेला असेल; भाजपच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांचा पलटवार

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे मुद्देसूद राजकारण करण्याऐवजी केवळ टीका आणि उपरोधिक वक्तव्यांवर भर देतात, असा आरोप साटम यांनी केला. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या या शाब्दिक संघर्षामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Ameet satam slams raj thackeray over chandrakant patil comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • amit satam
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray :  ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला
1

Raj Thackeray : ‘आज प्रबोधनकार असते तर लेखणीचे आसूड ओढले असते’; राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
2

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
3

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.