रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. (फोटो -सोशल मीडिया)
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) जोरदार प्रचार सुरु आहे. 29 महापालिकांसाठी निवडणूका जाहीर झाल्या असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. टीम मैदानात उतरली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कॉंग्रेसचे (Congress Politics) दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत एक वक्तव्य केले. यावरुन जोरदार राजकारण तापले. यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरात पत्रकारपरिषद अर्धवट सोडून निघून गेले आहेत.
लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार सभा घेतली. लातूर हे आजही विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील असे वक्तव्य केले होते. यावरुन कॉंग्रेससह संपूर्ण राज्यातून जोरदार टीका करण्यात आली. तसेच लातूरमध्ये देखील नाराजी व्यक्त होत होती. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण छत्रपती संभाजीनगरात पत्रकारपरिषद अर्धवट सोडून निघून गेले आहेत. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : “विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबाबत वक्तव्य केल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, “विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आमदार अमित देशमुख यांची दिलगिरी व्यक्त करतो. महापालिका निवडणुकीत विकासाच्या राजकारणावर चर्चा झाली पाहिजे,” असे देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार सभा घेतली. लातूर हे आजही विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील असे वक्तव्य केले. चव्हाण म्हणाले की, , “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही”. असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले होते. यावरुन जोरदार टीका करण्यात आली.
स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं… pic.twitter.com/5lAWjPI54s — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) January 5, 2026
हे देखील वाचा : “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर कॉंग्रेसने हल्लाबोल केला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूर शी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा!,” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.






