Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: अमित शहांचा मोठा दावा; बिहार निवडणुकीत यावेळी NDA ला दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळेल

News18 च्या 'सबसे बड़ा दंगल बिहार' कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले, अचूक संख्या सांगणे कठीण आहे, पण मी सांगू इच्छितो की आम्ही बिहारमध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवू.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 29, 2025 | 09:42 PM
अमित शहांचा मोठा दावा (Photo Credit - x)

अमित शहांचा मोठा दावा (Photo Credit - x)

Follow Us
Close
Follow Us:
  • केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास
  • ‘पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA पुन्हा सत्तेत येणार’
  • ‘लालूंच्या मुलासाठी कोणतीही जागा रिक्त नाही’

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी दावा केला आहे की, बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) युती दोन-तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकून मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येईल. News18 च्या ‘सबसे बड़ा दंगल बिहार’ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले, अचूक संख्या सांगणे कठीण आहे, पण मी सांगू इच्छितो की आम्ही बिहारमध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवू. आणि ‘आम्ही’ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA युती निवडणूक जिंकेल.”

#Exclusive | Amit Shah hits out at the opposition, calling it a “Maha-thug-bandhan” born out of compulsion and riddled with seat-sharing differences.@18RahulJoshi | #Bihar2025 #NDA #NitishKumar #News18DangalBihar #AmitShah pic.twitter.com/kFzI3Uybzl — News18 (@CNNnews18) October 29, 2025


अमित शाह यांनी पुढे म्हटले की, त्यांनी राज्याच्या ज्या-ज्या भागांचा दौरा केला आहे, तिथे त्यांना सत्ताधारी NDA युतीच्या बाजूने सकारात्मक लाट दिसत आहे. नेटवर्क १८ ग्रुपचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी बिहारच्या राजकीय मुद्द्यांवर अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Bangladesh National Anthem: काँग्रेसच्या कार्यक्रमात गायले बांगलादेशचे राष्ट्रगीत; नव्या वादाची ठिणगी? व्हिडिओ व्हायरल

डबल इंजिन सरकारचे यश

गृहमंत्री शाह म्हणाले, “आमच्या जागांच्या संख्येत अविश्वसनीय वाढ होईल. गेल्या ११ वर्षांत जे डबल इंजिन सरकार चालले, त्यापूर्वी नितीश कुमार आणि भाजपचे सरकार होते, त्यात खूप बदल झाले आहेत.” चांगल्या शासनामुळे आमच्या बाजूने ही लाट आहे. बिहारमध्ये ८७ लाख शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत आहे. बिहारच्या लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा थेट लाभ मिळत आहे.

‘नितीशजींच्याच नेतृत्वाखाली निवडणूक’

बिहारमध्ये NDA ची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होईल, या प्रश्नावर अमित शाह यांनी स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही नितीशजींच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवत आहोत, यात कोणताही संभ्रम नाही. मी हे स्पष्टपणे सांगितले आहे.” यासोबतच त्यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा टोला लगावला. “लालूजींची इच्छा आहे की त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, तर सोनियाजींची इच्छा आहे की त्यांचा मुलगा पंतप्रधान व्हावा. मी दोघांनाही सांगू इच्छितो की बिहारमध्ये आणि दिल्लीत कोठेही (तुमच्या मुलांसाठी) जागा रिकामी नाही.”

Fake Yamuna River: PM मोदींसाठी तयारी करण्यात आली खोटी यमुना नदी? छठपुजेदरम्यान ‘आप’ने केला गंभीर आरोप

Web Title: Amit shahs big claim nda will get more than two thirds majority in bihar elections this time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 09:41 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Bihar Election 2025
  • NDA

संबंधित बातम्या

Bihar Elections: मतांसाठी नाचा म्हटलं तरी पंतप्रधान नाचतील; बिहारच्या प्रचारामध्ये हे काय बोलून गेले राहुल गांधी
1

Bihar Elections: मतांसाठी नाचा म्हटलं तरी पंतप्रधान नाचतील; बिहारच्या प्रचारामध्ये हे काय बोलून गेले राहुल गांधी

Mahagathbandhan Manifesto: बिहार जिंकण्यासाठी ‘तेजस्वी’ यादवांचा प्रण! परिवारातील सदस्याला नोकरी, 5  गुंठे अन्…
2

Mahagathbandhan Manifesto: बिहार जिंकण्यासाठी ‘तेजस्वी’ यादवांचा प्रण! परिवारातील सदस्याला नोकरी, 5  गुंठे अन्…

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
3

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”
4

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.