Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची लॉटरी, अदिती तटकरेंसह उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कोकणच्या विधान परिषद उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले असून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असल्याचे समजत आहे.

  • By विवेक
Updated On: May 31, 2026 | 04:58 PM
Aniket Tatkare will contest Vidhan Parishad Election from NCP

Aniket Tatkare will contest Vidhan Parishad Election from NCP

Follow Us
Follow Us:

राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असलेला तिढा आता सुटला आहे. महायुती मध्ये जागावाटप फायनल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यातच आता महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या असून कोकणातील एक जागा त्यात समाविष्ट आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कोकणच्या विधान परिषद उमेदवारीसाठी अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाले असून ते उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असल्याचे समजत आहे.

या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर असून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पदरात पडून घेण्यास यश मिळाले आहे. यात कोकण विभागाची एक जागा समाविष्ट आहे. म्हणूनच अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीवरून त्यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. सोमवारी (१ जून) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधीच अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

मंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेल्याचे समजत आहे. तत्पूर्वी शनिवारी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. याबाबत त्यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवरूनदेखील माहिती दिली होती.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी त्यांनी आगामी जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन… pic.twitter.com/89bxZmXM3n — Aniket Tatkare (@ATatkare) May 30, 2026

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

भाजप – ११ जागा
सोलापूर
जळगाव
भंडारा – गोंदिया
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली
अमरावती
धाराशिव – लातूर – बीड
नागपूर
छत्रपती संभाजीनगर – जालना
अहिल्यानगर
सांगली- सातारा
नांदेड

शिवसेना – ४ जागा
ठाणे
नाशिक
परभणी
यवतमाळ

राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा
कोकण
पुणे

महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला ! भाजपला सर्वाधिक ११ जागा तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या नशिबात फक्त ‘इतक्याच’ जागा…

असा असेल विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.

“फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा कारखाना आणि फसवणुकीचा ब्रँड,” विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

Web Title: Aniket tatkare will contest vidhan parishad election from ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Vidhan Parishad Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.