
Anjali Damania criticizes Girish Mahajan over tree felling in Nashik political news
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरील राजकारण तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती की, त्यांनी नाशिकची झाडं तोडली. लोकांनी आंदोलन करा आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार असे ते आहे. गिरीश महाजन यांना लक्षात ठेवा.. राजकारणातून यांना फेकून द्या.., अशा कडक शब्दांत अंजली दमानिया यांनी निशाणा साधला.
हे देखील वाचा : संसदेच्या आवाराला काही मर्यादा आहे का नाही? TMC खासदारने थेट फुंकली E – Cigarette, कारवाईची मागणी
त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश करण्यासाठी जोर लावला. अंजली दमानिया म्हणाल्या की, “पुणे कोर्टात कलेक्टर तर्फे सेल डीड कॅन्सल करण्याचा अर्ज दाखल करण्यात आला. माझी भीती खरी ठरली, यात पुणे कोर्टात अर्ज करण्यात आला असून हा व्यवहार रद्द करण्यात यावा असे म्हणाले आहे. जमीन सरकारची आहे, सरकार, वतनाचे लोक आणि शीतल तेजवानी यांचे नाव आहे फक्त, हा व्यवहार फक्त रद्द केला जातोय कारवाई न करता, हे चुकीचे आहे,” असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
पुढे त्या म्हणाल्या की, “विरोधकांना विनंती आहे रे बाबा काहीतरी प्रश्न विचारा. काल माझ्याकडे महत्वाची माहिती आली. मुंढवा प्रकरण संदर्भात पीडीएफ मिळण्याचा प्रयत्न करते. अजित पवार शितल तेजवाणी कोणालाच वाचवू नका. मी कोणालाच सोडणार नाही. एफआयआरमध्ये पार्थ पवारचे नाव आले पाहिजे. लांबत चाललेली चौकशी लवकर झाली पाहिजे. क्रिमिनल लायबिलिटी आहे फ्रॉड झाले त्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे. हिवाळी अधिवेशनाला काय म्हणावं हेच समजत नाही. कोणीही येत काहीही विधान करते. फॅशन शो आहे का? बुध्दीची पातळी दिवाळखोरी म्हणावं हेच समजत नाही,” अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली.