बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राज्यातील वातावरण प्रचंड तापलं असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड बाबत अनेक पुरावे सादर केले आहेत. आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत.
अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांबद्दल संशय व्यक्त केला आहे. मला जे रिपोर्ट कळलेत त्यामध्ये ब्लड चे सगळ्या व्यवस्थित आहेत नॉर्मल आहेत काही प्रॉब्लेम नाही, असे म्हणत उद्याच्या उद्या कराडची रवानगी परत जेलमध्ये झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेवरून त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेवर निशाणा साधला आहे. या केसमधील अनेक मुद्यांवर बोलत त्यांनी काही तांत्रिक मुद्यावरही बोट ठेवत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
ऑफिस ऑफ प्रॉफिट ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. स्वतः आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठल्याही आर्थिक लाभ मिळून घेऊ शकत नाही, याला ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. पण व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे, त्याच्यात धनंजय मुंडे देखील आहेत, वाल्मीक कराडही आहेत आणि राजश्री मुंडे पण आहे. राजश्री मुंडे आजपर्यंत त्याच्या डायरेक्टर देखील आहेत. एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या आई हे सगळे टॉप मोस्ट शेअर होल्डर आज देखील आहेत. असं असताना व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक नावाची अजून एक कंपनी आहे, या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको कडून मिळतोय. च्या बॅलन्स शीट मध्ये फ्लाय अँश सेल दाखवलय, त्या बॅलन्स सीटवर धनंजय मुंडे यांची सही सुद्धा आहे. सुप्रीम कोर्ट चे रुलिंग आहेत की एक रुपया जरी मिळाला तरी, त्याला ” ऑफिस ऑफ प्रॉफिट” म्हटलं जातं. या मुद्यारून मुंडे यांचं मंत्रीपदच काय आमदारकीसुद्धा रद्द व्हायला पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे त्या म्हणाल्या की, मी EDG संजय सक्सेना यांच्याकडे आणि DG रश्मी शुक्ला पोलीस यंत्रणकडे कागदपत्र दिले आहेत, असे सांगतानाच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही दमानिया यांनी केली. मंत्रिपद असताना महाजेन को कडून त्यांना (मुंडे) जो आर्थिक नफा मिळतोय, त्यावनरू सरळ त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल, मी कोर्टाच्या डायरेक्शनची वाट बघते, असे दमानिया म्हणाल्या आहेत.