
DCM Eknath Shinde blessings of Balasaheb Thackeray at Shivtirth Before Thackeray brothers alliance
Eknath Shinde at Shivteerth : मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत आहेत. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी नवीन राजकीय समीकरणांसाठी शिवतीर्थावर भेट दिली आहे. शिवतीर्थावर भेट देत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत आशिर्वाद घेतले आहेत. मात्र त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवतीर्थावर दाखल झाले आहे.
शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे ठाकरे बंधू आपली अधिकृत युती जाहीर करत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांनी देखील बैठकांचे सत्र सुरु ठेवले आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर भेट दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या आहेत.
📍 #मुंबई | गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः गुरुः देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत #शिवसेना पक्षाने दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती… pic.twitter.com/mgPOKYcFAa — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 23, 2025
हे देखील वाचा : “हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांना लागलेला श्राप…; संजय राऊत म्हणाले काय?
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
निवडणुकीच्या पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर भेट दिली आहे. याबाबत सोशल मीडिया पोस्ट करत एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, “गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः गुरुः देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत #शिवसेना पक्षाने दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना वंदन करत विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी सर्व शिवसेना नेते, मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक तसेच शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपस्थित होते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ठाकरे बंधुंची युती; महापालिका निवडणुकीपूर्वी बदलणार राजकीय सत्ता समीकरणे?
ठाकरे बंधूंंनी देखील युतीच्या आधी शिवतीर्थावर जाऊन आशिर्वाद घेतले. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 11.30 वाजता हे शिवतीर्थावर एकत्र येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन आणि त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक पर्वाची ते सुरुवात करणार आहेत. आजचा दिवस यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर 12वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होणार आहे,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.