
भाजपमध्ये निर्माण झाली अंतर्गत नाराजी
भाजपचे 13 उमेदवार अपक्ष म्हणून उभे
रत्नागिरीच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलली
रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने केलेले तिकीट वाटप आणि त्यातून उद्भवलेली अंतर्गत नाराजी आता राजकीय भूकंपात रूपांतरित झाली आहे. पक्षाचे निष्ठावान आणि जमिनीवर कार्य करणारे ‘सच्चे १३ कार्यकर्ते’ यांनी नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक गटबाजीला कंटाळून थेट अपक्ष उमेदवार म्हणून रत्नागिरी नगपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे.
या ‘१३ शिलेदारां’मुळे रत्नागिरीच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली असून, संपूर्ण निवडणूक वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या ‘सच्या १३’ कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे भाजपासाठी बुध पातळीपासून ते प्रत्येक मोठ्या प्रचार मोहिमेपर्यंत रक्ताचे पाणी केले आहे. जनसंपर्क, संघटना बांधणी आणि शहरातील ज्वलंत विकास मुद्द्यांवर त्यांचे सातत्याने काम सुरू असल्याने त्यांची ओळख भाजपाचे ‘खरे रक्तदार सैनिक’ अशी आहे.
‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
सर्वपक्षीय उमेदवारांना फुटला अक्षरशः घाम
मात्र, तिकीट वाटप प्रक्रियेत त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली गेली नाही. स्थानिक नेतृत्वाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आणि प्रबळ गटबाजीमुळे हताश झालेल्या या कार्यकत्यांनी आता थेट ‘स्वाभिमानाचा लढा’ अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक कार्यकत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरा कार्यकर्ता मतदाराशी जोडलेला असतो; त्याची ताकद बुथवर दिसते, याच ताकदीच्या जोरावर हे १३ जण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने, त्यांच्या प्रभागांमधील सर्वच पक्षीय उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला आहे.
गणित बिघडले; मतविभागणीचा धोका
या १३ निष्ठावान कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे रत्नागिरीतील सर्वच पॅनेलचे आणि पक्षांचे निवडणूक गणित पूर्णपणे बिघडले आहे. स्थानिक स्तरावर तर ‘या तेरा बंडखोरांमुळे निवडणुकीचा संपूर्ण खेळच बदलणार’ अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. या अपक्ष उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी पारंपरिक भाजपाचा व काही ठिकाणी इतर पक्षांचाही मतदारवर्ग विभागला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसू शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये आता सरळसरळ लढतीऐवजी, तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी सामने रंगणार आहेत. यामुळे निवडणुकीची चुरस अभूतपूर्व वाढली आहे.
Local Body Election: भाजपचे नियोजन अन् कॉँग्रेस कचाट्यात…; चिपळूणमध्ये ‘इतके’ अर्ज अवैध
आता लक्ष वळले निवडणुकीच्या ‘मतपेटी’कडे !
भाजपमधील अंतर्गत वादामुळे रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची बनली आहे. या ‘सच्च्या 13 अपक्षां’नी घेतलेला ‘बंडाचा पवित्रा’ भाजपला किती महागात पडतो, तसेच त्यांची ताकद मतपेटीतून कशी उमटते आणि रत्नागिरीच्या राजकारणाची नवी दिशा कशी ठरते, हे पाहणे आता अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. या बंडखोर १३ कार्यकत्यांच्या प्रभागांची आणि त्यांच्या उमेदवारीमुळे कोणत्या प्रमुख उमेदवाराला अधिक धोका आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Ans: रत्नागिरी भाजपमध्ये अंतर्गत नाराजीमुळे 13 कार्यकर्ते अपक्ष लढणार आहेत.
Ans: भाजपमधील अंतर्गत वादामुळे रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची बनली आहे.