गुहागरमध्ये भाजपा-सेनेमध्ये प्रतिष्ठा पणाला (फोटो- सोशल मीडिया)
नगराध्यक्षपदासाठी वरिष्ठामध्येच अनेक दिवसापासून चढाओढ,
१७ जागांपैकी ६ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार
युतीची कबुली दिली, तरी कागदावर युती नाही
गुहागर: गुहागर येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत भाजप-सेना युतीमध्ये अजूनही जुळून आले नसून दोघांनाही नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाले आहेत. गेले दहा दिवस युतीमध्ये नगराध्यक्षपद भाजपला की सेनेला यामध्ये सध्या वरिष्ठांमध्येच् चढाओढ लागली असून दोन्ही पक्षांसाठ आता हा विषय प्रतिष्ठेचा बनला आहे. यामुळे अखेर नगरसेवक पदावरही जास्तीत जास्त अर्ज दोन्ही पक्षाकडून दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून निता मालप तर शिवसेना शिंदे गटाकडून मयुरी मूकनाक यानी एबी फॉर्मसहा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उबाठ शिवसेनेकडून १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
१७ जागांपैकी ६ जागांव राष्ट्रवादीचे उमेदवार
उबाठाच्या जोडीला मनसे असली तरी त्या पक्षाकडून एबी नसल्याने रेल्वे इंजिन चि नाही. यामुळे हे उमेदवार अपक्ष उमेदवार गणा गेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये महायुतीमधून ए दिवस अगोदरच आपण महायुतीमध्ये नसल्य जाहीर करत १७ जागांपैकी ६ जागांवर उमेदव उभे केले असून नगराध्यक्ष पदाचाही उमेदवा अर्ज दाखल केला आहे.
‘तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना’ असे चित्र
महायुतीमधून राष्ट्रवादी बाहेर पडल्याने भाजप-सेना युती शिल्लक राहिली असली तरी दाखल झालेल्या उमेदवारीमध्ये युती नसल्याचे समोर आले आहे. भाजपाने पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन दाखवले. युतीमधून भाजपचाच उमेदवार हा प्रतिष्ठेचा विषय बनला असून आपण अर्ज दाखल करूया वरिष्ठ पातळीवरून जो आदेश येईल तो सर्वमान्य होईल, अशा कबुलीवर ‘तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना’ असेच चित्र आज पहावयास मिळाले. भाजपने १७ सदस्य पदाच्या जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनाही मागे नाही.
युतीची कबुली दिली, तरी कागदावर युती नाही !
गतवेळी शहर विकास आघाडीतून आपली ताकद दाखवणाऱ्या कुणबी फॅक्टरने आपलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यासाठी जोर लावला आहे. यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबरोबर सदस्य पदाच्याही सर्वाधिक जागा मिळाव्यात
यासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप-सेना युतीमधील सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आपली युती असल्याची कबुली दिली असली तरी कागदावर युती नाही.






