
BJP Candidate Maithili Thakur Blueprint is private statement viral in bihar elections 2025
Maithili Thakur Blueprint: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून प्रचार देखील वाढला आहे. उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या बैठका, सभा आणि रॅलीला उधाण आले आहे. बिहारमधील अनेक उमेदवारांची चर्चा देशभर सुरु आहे. यामध्ये बिहार भाजपची स्टार उमेदवार मैथिली ठाकुर ही ब्लू प्रिंटमुळे चर्चेत आले आहे. पत्रकारने ब्लू प्रिंटबद्दल विचारताच ही खाजगी बाब असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मैथिली ठाकूरवर चौफेर टीका होत आहे.
गायिक असलेली मैथिली ठाकूर ही भाजपची 25 वर्षीय उमेदवार आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोक गायिका मैथिली ठाकूर यांना तिकीट दिले आहे. प्रचारामधील अनेक घटनांमुळे ती चर्चेत आली आहे. निवडणूकीपूर्वी तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर, स्वतःला ‘मिथिलाची कन्या’ म्हणवणाऱ्या मैथिलीचा बिहार निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत समावेश करण्यात आला. यानंतर जोरदार प्रचार करत असून मैथिलीच्या प्रचारामधील गाणी गाताना देखील व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण तिने अलिकडेच केलेल्या एका विधानामुळे या निवडणुकीच्या वातावरणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे तिला ट्रोलर्सने देखील धारेवर धरले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मैथिली ठाकूरची का उडवली जातीये खिल्ली?
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मैथिलीला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. यावेळी तिने दिलेल्या हास्यास्पद विधानामुळे मैथिली ठाकुर ट्रोल होत आहे. पत्रकाराने उमेदवार मैथिली ठाकुर हिला विचारले की तिच्या प्रदेशाच्या विकासाचा ब्लूप्रिंट काय आहे, तेव्हा तिने उत्तर दिले: “मी हे सार्वजनिकरित्या कसे उघड करू शकते? ही पूर्णपणे खाजगी आणि गोपनीय बाब आहे.” मैथिली या उत्तरामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. ब्र्लू प्रिंट या शब्दांचा अर्थ लक्षात न घेता उमेदवार मैथिली ठाकुरने दिलेल्या उत्तरावर एकच हशा पिकला आहे.
Reporter : What is your blueprint for the people of your constituency? Maithili Thakur : How can i tell you the Blue print publicly , it is a personal matter and a secret 😹😹😹 Another Anpadh detected. pic.twitter.com/wSsDCsymVz — Roshan Rai (@RoshanKrRaii) November 2, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मैथिली ठाकुरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर तीव्र टीका केली. काहींनी राजकीय समज नसलेले उमेदवार उभे करणे हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे असा प्रश्न उपस्थित केला. काहींनी लिहिले की जेव्हा एखादा उमेदवार त्यांच्या योजनांना गुप्त म्हणतो तेव्हा त्यांच्याकडे अजिबात योजना नाहीत हे स्पष्ट होते. काहींनी स्पष्ट केले की मतदारांचा विचार करणारे नेते हवे आहेत, रिकाम्या चेहऱ्यांनी नव्हे जे प्रत्येक खरा प्रश्न टाळतात. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की जेव्हा एखादा उमेदवार त्यांच्या मतदारसंघाच्या ब्लूप्रिंटला “वैयक्तिक गुपित” म्हणतो तेव्हा ते अज्ञानाचे प्रकरण नाही, तर एक राजकीय पक्ष लोकांना नागरिकांची सेवा करण्याऐवजी त्यांच्या नेतृत्वाचे अनुसरण करण्यास कसे प्रशिक्षित करतो हे दर्शवितो.