Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : जिल्हा परिषदेत कमळ फुललं; सातारा झेडपीवर भाजपचा झेंडा फडकला

अत्यंत अटीतटीच्या आणि राजकीय खेचाखेचीच्या राजकारणामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अखेर भाजपने बाजी मारली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2026 | 03:03 PM
Satara News : जिल्हा परिषदेत कमळ फुललं; सातारा झेडपीवर भाजपचा झेंडा फडकला
Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषदेत कमळ फुललं,
  • सातारा झेडपीवर भाजपचा झेंडा फडकला
सातारा : अत्यंत अटीतटीच्या आणि राजकीय खेचाखेचीच्या राजकारणामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अखेर भाजपने बाजी मारली. बहुमताचे पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी व शिवसेनेला बाजूला ठेवत भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे हे धुरंदर ठरले शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नाट्य रंगलेल्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत अखेर भाजपच्या प्रियाताई शिंदे यांचे अध्यक्षपदी तर बाबाराजे समर्थक राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार यावेळी नोंदवण्यात आली होती. सदस्यांना अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आणण्यात आले.

सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सदस्य आणि साताऱ्याचे पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चांगलीच ओढाताण झाली त्यामुळे शुक्रवारचा दिवस साताऱ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक नाट्यमय घडामोडींचा ठरला भारतीय जनता पार्टीने अनेक राजकीय पर्यायांचा वापर करत अध्यक्ष पदावर आपली मोहर उमटवली आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला मात्र साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

शाब्दिक चकमक आणि जोरदार धक्काबुक्की
शुक्रवारी निवड प्रक्रियेच्या दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व सदस्य लक्झररीतून जिल्हा परिषदेच्या सभागृहात येताना पोलीस बंदोबस्तामध्ये आणण्यात आले या सर्व राजकीय परिस्थितीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंती मकरंद पाटील हे स्वतः जातीने लक्ष ठेवून होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कोणालाही सोडण्यात येत नव्हते जि प सदस्य मान्यवर नेतेमंडळी यांना वगळता पोलिसांनी कोणालाही आत येऊ दिले नाही. सदस्यांना आत आणताना त्यांच्या ओळख परळीवरून सदस्य आणि शाहूपुरी पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि जोरदार धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

दोन जिल्हा परिषद सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी भाजपला सहा मतांची गरज होती दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एकत्रित राहणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचे पारडे जड होते त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष साताऱ्याकडे लागून राहिले होते.साताऱ्यात गुरुवारी 19 मार्च रोजी रात्रभर आणि घडामोडी घडल्या त्यात राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही स्वतः पक्ष सोबत गेल्याचे लेखी दिले आहे असे राष्ट्र‌वादीचे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले.

Satara News: साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भाजपची दांडगाई, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा आरोप

शेवटच्या क्षणी ‘गेम चेंजर’ ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा
मात्र मतदानाच्या काही तास आधीच राजकीय घडामोडींना वेग आला. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या सक्रिय हालचालीमुळे विरोधी आघाडीतील काही सदस्य फुटल्याची चर्चा रंगली. या अनपेक्षित घडामोडीमुळे सभागृहातील बहुमताचे समीकरण पूर्णपणे बदलले, त्यामुळे भाजपला विजय मिळवता आला.या विजयामागे ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधी पक्षातील काही सदस्यांनी ऐनवेळी बाजू बदलल्याने भाजपला आवश्यक संख्याबळ मिळाले आणि त्यानी दोन्ही पदांवर विजय मिळवला. दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये खडा जंगी पालकमंत्र्यांचा रक्तदाब वाढला.

दोन सदस्य मतदान प्रक्रियेत अनुपस्थित
राष्टवादीचे जि प. सदस्य अनिल देसाई, संतोष मांडवे या दोन्ही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांच्यावर रात्री गुन्हा दाखल केला होता निवडीसाठी आले असता जिल्हा परिषद मधून त्यांना ताब्यात घेतले, त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत.

Pune News : 40 गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल; उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा विश्वास

Web Title: Bjp flag hoisted at satara zp priyatai shinde as president and raju bhosale as vice president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • maharashtra news
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर
1

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
2

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन
3

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र
4

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.