Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

राज ठाकरे यांनी आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात लढा उभारण्याचे आवाहन केले आहे. पहिली लढाई निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आहे. त्यानंतर ईव्हीएमविरोधातील लढा उभा करावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2026 | 12:59 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Follow Us
Follow Us:

मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल मी आणि माझा पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून जे सांगत होतो ते आता स्पष्टपणे समोर आले आहे. आयोगाला हाताला धरून एसआयआर आणि मतदारयाद्या यात घोटाळे करून भाजपने निवडणुका कशा जिंकल्या हे आता दिसलेच आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हा तर व्हायलाच हवा, पण या असल्या कणाहीन निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे सरकार निवडून आले त्या सरकारने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात लढा उभारण्याचे आवाहन केले आहे. पहिली लढाई निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आहे. त्यानंतर ईव्हीएमविरोधातील लढा उभा करावा. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, यासाठी विरोधी पक्षांनी जनआंदोलन उभारले पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले. यापुढची लढाई ईव्हीएम विरोधातील असेल असेही ते सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, २०२५ च्या अखेरीस महापालिका निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत होते. त्यावेळी या अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्षात कोणतेच अधिकार नसल्याचे आम्हाला जाणवत होते. आम्ही हे जाहीरपणे अनेकदा बोललो. दोन निवडणूक आयुक्तांनी वारंवार आक्षेप नोंदवले आणि तरीही आयोगाने आपली प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निर्णय घेत होते असे चित्र दिसते. मात्र, त्यांना हे निर्णय घ्यायला लावणारे कोण होते, याची चौकशी झाली पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले.

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्या निर्णयांमागे कोण होते, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधारी सरकारवरही निशाणा साधला. “कणाहीन निवडणूक आयोगाला हाताशी धरून सरकार निवडून आले असेल तर त्या सरकारनेही राजीनामा द्यावा”, अशी मागणी त्यांनी केली.

मते कोण चोरते, याचे उत्तर मिळाले

भाजपधार्जिणे पत्रकार नेहमी विचारतात की तुमच्या सभेला गर्दी होते, मग मते कुठे जातात? आता त्यांना आमची मते कोण चोरतं आणि त्यांना कशी आणि कोणाची मदत मिळते, याचे उत्तर मिळाले असेल असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Raj Thackeray : ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Web Title: Mass movement against evms to be launched raj thackeray announces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • EVM Scam
  • Maharashtra Politics
  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
1

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
2

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.