Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

उदयनराजेंनी आपली भूमिका ही सहकाराच्या हिताच्या दृष्टीने असल्याचे स्पष्ट केले असले, तरी आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 09:23 AM
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्याच दिवशी गृहनिर्माण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. ‘बँक टिकवायची की मोडकळीस काढायची?’ असा सवाल उपस्थित करत सहकार संस्थांच्या निवडणुका पक्षीय चौकटीबाहेर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उदयनराजे म्हणाले, विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या माध्यमातून लढविल्यानंतर त्या बँकांच्या कारभारावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पक्षनिरपेक्ष पद्धतीने होऊन बँकेच्या हिताला प्राधान्य मिळाले पाहिजे. सहकार क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कोणाचीही भेट घेणार नाही

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार का, याबाबत विचारले असता उदयनराजेंनी या विषयासाठी कोणाचीही भेट घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या निवडणुकीबाबत चर्चा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेचा प्रश्न हा स्थानिक पातळीवरील असून सहकार संस्थांचा कारभार राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

21 जागांवर राजकीय गणिते जुळणार

जिल्हा बँकेच्या २१ संचालक जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे. विविध मतदारसंघांची रचना, मतदारसंख्या आणि सहकार क्षेत्रातील स्थानिक नेत्यांचा प्रभाव यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे.

स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीची शक्यता

भाजपसह महायुतीतील घटक पक्षांकडून बँकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी होण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात उदयनराजेंनी पक्षीय राजकारणापासून निवडणूक दूर ठेवण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भूमिकेचा निवडणुकीवर काय परिणाम?

उदयनराजेंनी आपली भूमिका ही सहकाराच्या हिताच्या दृष्टीने असल्याचे स्पष्ट केले असले, तरी आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एका बाजूला विविध राजकीय गटांकडून संभाव्य पॅनेल आणि उमेदवारांबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पक्षनिरपेक्ष निवडणुकीचा आग्रह उदयनराजेंनी धरला आहे.

जिल्हा बँकेचा संबंध शेती, सहकार, दूध व्यवसाय, साखर उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी असल्याने संचालक मंडळाची निवड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोणते गट एकत्र येतात, कोणत्या मतदारसंघात कोणाची मोर्चेबांधणी होते आणि उदयनराजेंच्या भूमिकेला कोणता प्रतिसाद मिळतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: No politics in the satara district bank election says mp udayanraje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • political news
  • Satara District Bank Election
  • Satara News
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज
1

Satara Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे बिगूल वाजले; पहिल्याच दिवशी सहा अर्ज

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.