पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्री महाजन यांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश; म्हणाले, 'मदत आणि पुनर्वसन कार्य...'
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक नेत्यांना मंत्रिपदं मिळाली. बहुतांश जिल्ह्यांत पालकमंत्रिपदाची निवडही झाली. त्यात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाच्या निवडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचे देखील दिसून आले आहे. दरम्यान, भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे.
भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तसेच पालकमंत्री पदाबाबत देखील माध्यमांनी गिरीश महाजन यांना प्रश्न केले. यावेळी महाजन म्हणाले की, “नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं पाणी बाबत आढावा घेतला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी बरं आहे. नियोजन करून पाणी वापरले पाहिजे. जलजीवन योजनेला हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. काही ठिकाणी काम अजून पूर्ण झाले नाहीत. बऱ्याच ठिकाणी अडचणी आहेत त्यावर देखील उपाययोजना सुरू आहे,” अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी नाशिकच्या विकासकामांबाबत देखील माहिती दिली आहे तसेच नाशिकमध्ये लवकरच मेट्रोचे काम सुरु होणार असल्याचे देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “संपुर्ण जलजीवन योजना फोल ठरली आहे असे म्हणं चुकीचे आहे. झिरवाळ यांनी ही योजना फोल ठरल्याचे आरोप केला होता. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करब्याबाबत मी आज बैठक घेतो आणि निर्देश देतो. लवकरचं नाशिकमध्ये मेट्रो कामाला देखील सुरुवात होईल, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निर्णय घेतील आज मला सांगितले म्हणून मी इथे आलो,” असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी केली जात आहे. कुंभमेळ्याची आढावा बैठक देखील पार पडली असून भाविकांच्या सोयी सुविधांचा विचार केला जात आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “कुंभच्या कामांना देखील लवकर सुरू होणार आहे. अजून वेळ आहे तरी वेळेत सर्व काम होतील. कामांना गती दिली आहे. वेळेत सर्व काम पूर्ण होतील. पाकिस्तानी नागरिक असतील तर त्यांना हुडकून काढले जाईल. जातीय जनगणना ही एक ऐतिहासिक निर्णय आहे,” असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.