bjp gopichand padalkar target uddhav thackeray shivsena melava political news
Gopichand Padalkar Marathi News : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी मुंबईसह इतर भागांमध्ये राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाचा 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दोन शिवसेना गटाचे दोन वर्धापन मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये तुफान राजकीय बॅटिंग दिसून आली. उद्धव ठाकरे यांचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता राजकारण तापले आहे. मात्र भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “संपूर्ण देश बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही मात्र अत्यंत दुर्देवी बाब आहे. गावाकडे आजी आमची म्हणायची, कोणी वारलं तर ते आपल्याकडे स्वर्गातून बघत असतात, त्याचप्रमाणे बाळासाहेब हे बघत असावेत, त्यांना किती वेदना होत असतील. आमच्याकडे एक म्हण आहे, मुलाच्या पोटी केरसुणी जन्माला येते असे आम्ही म्हणतो, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, आज देशात हिंदुत्वाच वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्देवाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणा बंद करावं” अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. “उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे. लोकांनी 2024 ला त्याचा वाचपा काढला आणि भाजपला निवडून दिले. उद्धव ठाकरेंना रोज चार लोक सोडून जातात, त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका. उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही. त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये” अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र डागले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करताना व्हिडिओ व्हायरल झाला. याला संजय राऊत यांनी नवा हॉरर चित्रपट असे म्हणत हिणवले. याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, “संजय राऊत हे अडचणीत आहेत. त्यांना काही पूजा करायची असेल, तर त्यांनी मला सांगावं. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना शांती तरी लागेल. महाविकास आघाडीतील नेत्यांना निवडून येण्याची शाश्वती नाही. संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल, तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो. संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील, त्या ठिकाणी पूजा करतो. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान असेल, त्यांना जिथे वाटते तिथे पूजा घालतो. संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी. पूजा करणं गरजेचं आहे. त्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून आपण पूजा करू” असं संजय राऊत म्हणाले.