शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पुजेबाबत स्पष्टीकरण दिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Bharat Gogawale Aghori Pooja :रायगड : शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले हे सध्या चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहेत. भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये भरत गोगावले हे तंत्र मंत्र करणाऱ्या व्यक्तीसमोर बसलेले दिसून आले. भरत गोगावले यांचा हा अंधश्रद्धा करतानाचा व्हिडिओ महायुतीमधील नेत्यानेच पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत आता भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी सिंहासारखे आसन असलेल्या मोठ्या खुर्चीवर बसलेले दिसून येत आहे. यावेळी त्यांच्यासमोर काही भस्म लावलेले आणि जटाधारी साधू दिसून येत आहेत. हे साधू कोणतीतरी मंत्र साधना करत असल्याचे दिसत आहे. तसेच आजूबाजूला आणखी काही साधू भगवाधारी कपड्यांमध्ये देखील दिसत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या व्हिडिओनंतर भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी अघोरी विद्या करत असल्याची चर्चा होती. यावर आता त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. कर्जत येथे मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी आढावा बैठक घेतली. या बैठकीप्रसंगी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी गोगावले यांनी सध्या अघोरी विद्येच्या, पूजेच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आणि विरोधकांना टोलाही लगावला आहे.
या प्रकरणाबाबत मंत्री भरत गोगावले म्हणाले की, ”आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही लढणारे आहोत, रडणारे नव्हे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. एकनाथ शिंदेंसारख्या प्रामाणिक नेत्यासोबत आम्ही काम करतो त्यामुळे ही अघोरी विद्या, अघोरी पूजा वगैरे आम्हाला काहीही कळत नाही, आम्हाला ते माहीत नाही. जे नशिबात आहे तेच होतं. अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री पद मिळवलं असतं”, असं म्हणतं भरत गोगावले यांनी आरोप करणाऱ्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, ”अघोरी, बिगारी आम्ही जाणत नाही, साधू महात्मे भेटायला येतात त्यानं आम्ही भेटतो. राष्ट्रवादी कडे मुद्दे नाहीत म्हणून ते शोधाशोध करीत आहेत” अशी टीकाही गोगावले यांनी केली. भरत गोगावले यांची व्हिडिओ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी शेअर केली होता. यामध्ये त्यांनी बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असे कॅप्शन दिले होते.