
Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, "आगामी काळात होणाऱ्या..."
मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन
अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित
अमित शहांची विरोधकांवर टीका
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप जेष्ठ नेते अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या हस्ते मुंबईमधील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरामध्ये असणाऱ्या या भाजपच्या कार्यालयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. तसेच त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे. अमित शहा काय म्हणाले ते आपण पाहुयात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “आजचा दिवस महाराष्ट्र भाजपसाठी आनंदाचा आहे. ही केवळ कार्यालय नसून आमच्यासाठी ते मंदिरच आहे. या कार्यालयात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळते. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे काम करण्याचे ठिकाण असेल. मात्र आमच्यासाठी ही मंदिरच आहे. मी सर्व महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा.”
भाजपाची कार्यालये सेवा आणि लोककल्याणाचे प्रतीक आहेत. मुंबई येथे महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करीत आहे. मुंबई में महाराष्ट्र भाजपा के नए कार्यालय का भूमि पूजन कर रहा हूँ।@BJP4Maharashtra https://t.co/gtqZeoDDy1 — Amit Shah (@AmitShah) October 27, 2025
पुढे म्हणाले अमित शहा म्हणाले, “चा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. सागरी क्षेत्र देशाच्या ‘जीडीपी’त ६० टक्क्यांहून अधिक योगदान देते. पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारत सागरी व्यापारात अग्रस्थानी होता. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिद्ध करत आहे. सागर, सागरमाला, गतिशक्ती आणि समुद्रयान यासारख्या प्रकल्पांमुळे सागरी पायाभूत सुविधांना नवे बळ मिळाले आहे. भारत जहाजबांधणीत जगात पाचव्या क्रमांकावर असून नवीन बंदरांचीही उभारणी वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.”
भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची?
अमित शाह यांच्या हस्ते मुंबईमधील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरामध्ये असणाऱ्या या भाजपच्या कार्यालयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संशय उपस्थित केला आहे. भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या जमीन घोटाळ्यांच्या चर्चा जोरात असताना, मुंबईतील भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाने राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईतील या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या जागेच्या मालकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, भाजपा नेत्यांना खुलासा करण्याची मागणी केली आहे.