Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“धर्मवीर 3′ ची पटकथा मी लिहिणार…”; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाची जोरदार चर्चा

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांची भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला

  • By प्रीति माने
Updated On: Sep 27, 2024 | 12:47 PM
Devendra Fadnavis statement about Dharmaveer 3 movie

Devendra Fadnavis statement about Dharmaveer 3 movie

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. काल सायंकाळी धर्मवीर 2 चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते. त्यानंतर आता या सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. धर्मवीर 3 या चित्रपटाची कथा मी लिहिणार असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

धर्मवीर 2 चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांना प्रतिक्षा असलेला धर्मवीर 2 प्रेक्षकांच्या भेटीस आला असून चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू झाले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित धर्मवीर 1 हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला. त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला. त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की ‘धर्मवीर 2’ आला पाहिजे. ‘धर्मवीर 1’  या चित्रपटाला प्रेक्षकांनी  डोक्यावर घेतले. लोकांना तो अतिशय आवडला. एखाद्या चित्रपटातले चरित्रनायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय असे चरित्रनायक जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतात, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले जातात, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

🔸Grand Premiere of ‘Dharmaveer 2, Mukkam Post Thane’
🔸’धर्मवीर 2, मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिमियर’
🕚11pm | 26-9-2024📍Mumbai | रा.११ वा. | २६-९-२०२४📍मुंबई.@cbawankule @mipravindarekar @PrasadLadInd @GopichandP_MLC @DrSEShinde @KayandeDr @prasadoak17… pic.twitter.com/PxLHIldr16

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 26, 2024

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसापर्यंत जात आहे. यातूनच लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. मलाही चित्रपटाबाबत उत्कंठा आहे. काही गोष्टी मी पाहिल्या आहेत, काही पाहायच्या आहे, अशी उत्सुकता फडणवीस यांनी केली. तसेच माध्यमांनी तुम्ही चित्रपट निर्माण करणार का ? यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सूचक विधान करत मिश्कील टिप्पणी केली. फडणवीस म्हणाले की, जेव्हा धर्मवीर ३ येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन” अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर 2 चित्रपटातून शिवसेनाप्रमुख हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा ठाणेचे जिल्ह्याध्यक्ष आनंद दिघे मोठे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या मदतीने बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारेंसारखे अनेक लोक आनंद दिघेंच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरांवर काल्पनिक कथा रचून पडद्यावर चित्रपट आणण्यापेक्षा धर्मवीरांप्रमाणे तुम्ही शिवसेनेप्रती निष्ठा बाळगली असती, तर तुम्हाला असे चित्रपट काढून स्वत:चा डंका पिटायची वेळ आली नसती. देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबवर चित्रपट काढावा, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Bjp leader dcm devendra fadnavis talk about dharmaveer 3 movie script

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadanvis
  • sanjay raut

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
1

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
2

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
3

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा
4

छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.