Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Alleges Rs 150 Crore Offer: डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Alleges Rs 150 Crore Offer:  जर पाच वर्षांपूर्वी एक आमदार ५० कोटींना विकला जाऊ शकतो. खासदार ७५ कोटींना विकला जाऊ शकतो तर आता महागाई वाढली आहे तर १५० कोटींचा आकडा हा सन्माननीय आकडा आहे. असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 21, 2026 | 11:59 AM
Sanjay Raut Delimitation Bill Allegation, Sanjay Raut 150 Crore MP Claim,

Sanjay Raut Delimitation Bill Allegation, Sanjay Raut 150 Crore MP Claim,

Follow Us
Follow Us:
  • डीलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर
  • हा निधी मुंबईतून जाणार असून त्याची जबाबदारी महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांकडे
  • देश आर्थिक  अराजकतेच्या उंबरठ्यावर असून त्याचा कधीही स्फोट
Sanjay Raut Alleges Rs 150 Crore Offer:  केंद्र सरकार डीलिमिटेशन बिल आणण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी केंद्र सरकारची जुळवाजुळव करत आहे. बिलाला मान्यता मिळावी, यासाठी राजकीय पक्षांना, खासदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही वेगळा सूर उमटत चालला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी,डिलिमिटेशन बिलासाठी खासदार विकत घेतले जात असल्याचा, धक्कादायक दावा केला आहे.

 खासदारांचा १५० कोटींचा भाव 

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “तुमचे सरकार ५०-१०० कोटी रुपये देऊन आमदार विकत घेत आहेत. आताही अमित शाहा हे डिलिमिटेशन बिलासाठी खासदार विकत घेत आहेत. त्यासाठी त्यांनी १५० कोटींचा भाव लावला आहे. पार्लमेंटचे अधिवेशन का होत नाही, कारण त्यांना खासदार जमा करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी १५० कोटींचा भाव लावला आहे. जर महाराष्ट्रातील खासदारांनी त्या बिलाला पाठिंबा दिला तर मी सांगितलेला आकडा लक्षात ठेवा. संजय राऊत जी बातमी असते ती इंटिलेजन्सच्या पुढची असते. १०० कोटीवरुन १५० कोटींवर आलेला हा आकडा अलीकडच्या दोन दिवसातला आहे. अमित शाहा मुंबईत दोन महिन्यात कितीवेळा आले. का आले, मुंबईत बसून त्यांना कोणते व्यवहार करायचे आहेत. १५० कोटींना खासदार विकत घेऊन त्यांना डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचे संख्याबळ जमा करायचे आहे. ते इनकम टॅक्सला कळवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Cold Wave: राज्यात कुडीकुडी अन् हुडहुडी! धुळ्यात पारा ६.३ तर निफाडमध्ये ६.५ अंशांवर, पुण्यात किती?

हा पैसा मुंबईतून जाणार

हा पैसा मुंबईतून जाणार आहे. त्यांची जबाबदारीही महाराष्ट्रतल्या काही प्रमुख राजकीय पुढाऱ्यांकडे दिली आहे. १५० कोटी रुपये ही रक्कम काय चिंता करण्यासारखी नाही. जर पाच वर्षांपूर्वी एक आमदार ५० कोटींना विकला जाऊ शकतो. खासदार ७५ कोटींना विकला जाऊ शकतो तर आता महागाई वाढली आहे तर १५० कोटींचा आकडा हा सन्माननीय आकडा आहे. असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. आमचे सहा खासदार गेले, ते ८०-८० कोटींना गेले, त्यांना १५ कोटी आधीच गेले होते. हा एकनाथ शिंदे यांचं डिल होतं. जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव असतो, तसा हा पॉलिटिकल नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

राजस्थान निवडणूक

निवडणूक यंत्रणेवर जनतेचा दबाव असल्यामुळे राजस्थामधील निवडणुकीत त्यांना फार गडबडघोटाळे करता आले नाहीत. त्यामुळे भाजप विरुद्धचा प्रवाह दिसून आला, हा दबाव कायम राहिला तर २०२९ मध्ये भाजप किंवा मोदी शहांची सत्ता कदापि येणार नाही. मोदींचा राजयोग संपला आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

India A vs Pakistan A: पुन्हा हायव्होल्टेड ड्रामा Sunday! ‘आमच्यासाठी हा फक्त सामना…’, कर्णधार तिल

देश आर्थिक  अराजकतेच्या उंबरठ्यावर असून त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो, हे स्वत: पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी मान्य  केलं आहे. उद्योगपतींना एवढी सुट दिल्यानंतर देशात रोजगार नाहीयेत. म्हणजे देशात कधीही बेरोजगरीचा स्फोट होऊ शकतो हे त्यांनी मान्य केलं आहे.  पाण्यावर आंदोलन करण्याचे सोडून  भारत पाकिस्तानवर आंदोलन करत आहात, असंही संजय यांनी म्हटलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांनी डीलिमिटेशन बिलाबाबत कोणता दावा केला आहे?

    Ans: केंद्र सरकार डीलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांचे संख्याबळ जमा करत असून, त्यासाठी खासदारांना १०० कोटींवरून वाढवून १५० कोटी रुपयांचा भाव लावण्यात आल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • Que: संसदेच्या अधिवेशनाबाबत संजय राऊत यांनी काय म्हटले आहे?

    Ans: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांची जुळवाजुळव करता यावी आणि संख्याबळ गोळा करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठीच संसदेचे अधिवेशन घेतले जात नसल्याचा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

  • Que: अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यांवरून राऊत यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत?

    Ans: गेल्या दोन महिन्यांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वारंवार मुंबईत का आले आणि खासदार खरेदीचा पैसा मुंबईतूनच जाणार असून त्याची जबाबदारी महाराष्ट्रातील प्रमुख पुढाऱ्यांवर सोपवली आहे का, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: Sanjay raut alleges rs 150 crore offer to mps for delimitation bill targets as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Amit Shah
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर
2

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
3

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.